Voting  Sakal
मुंबई

Loksabha News: भिवंडी मतदारसंघात मतदान टक्का घसरणार ? उमेदवारांसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi Loksabha News: भिवंडी हे कामगारांचे शहर असल्याने या ठिकाणी देशातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या राज्यातील लाखो लोक रोजगारासाठी येथे येत असतात. त्यापैकी अनेक कामगार व मालक, व्यापारीवर्गाचे कुटुंबे स्थायिक झाले आहेत.

उन्हाळी सुट्टी लागल्याने हजारो लोक गावी जात आहेत. अशा वेळी भिवंडी लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांना २० मे रोजी मतदान केल्यानंतरच मुलुखात जावे, असे सांगत आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परप्रांतीयांना रोजगार देणारा मतदारसंघ आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांनी चार महिन्यांपूर्वी यूपी, बिहारसाठी तिकीट काढले होते. त्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तिकीट अगोदरच काढले असल्याने हे कुटुंबे ते रद्द करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यूपी, विहार, कर्नाटक, मद्रास, बंगालमध्ये जाणाऱ्या स्थलांतरितांची अवस्था अशी आहे की, जून, जुलैपर्यंत सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे तिकिटे रद्द करणे अवघड आहे.

उन्हाळ्यात शाळांना सुट्टी लागल्यावरच परप्रांतीय मोठ्या उत्साहाने गावाकडे जाऊ लागतात. राजकीय पक्षांचे नेते आणि समर्थक २० मेनंतरच गावोगावी जाण्याचा आग्रह धरत आहेत

मतदान न करताच गावचा रस्ता

अनेक ठिकाणचे हजारो लोक मतदान न करता आपले घर सोडून गेल्याने मतदानाचा टक्काही कमी होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. हे मतदार मुलुखात गेल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT