kokan sakal
मुंबई

कोरोनामुळे हरवलेला ‘सूर’ शोधतो आहे!

मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले नितीन रणखांबे लहानपणापासूनच मुंबईत जीटीबी नगरमधील रावळी कॅम्पमध्ये राहतात.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा शिरकाव मार्च-एप्रिलमध्ये लग्न सराईच्या दिवसातच झाला. मोठा आर्थिक फटका बसला. कामाशिवाय ५-६ महिने काढले. जवळची सर्व पुंजी संपली. आता पोट कसे भरायचे हा प्रश्न आहे. ‘बँजो पार्टी’त काम मिळत नसल्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. किती काळ वाट बघणार, शेवटी मजबुरीत अनेकांनी मिळेल ते काम करणे सुरू केले.

मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले नितीन रणखांबे लहानपणापासूनच मुंबईत जीटीबी नगरमधील रावळी कॅम्पमध्ये राहतात. पत्नी, दोन मुले, आई असे त्यांचे कुटुंब. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांना बुलबुल वाजवण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच बुलबुल, कॅसिओ, ढोल-ताशा अशी वाद्ये ते वाजवू लागलो. कुठलेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता मित्रांच्या मदतीने आणि स्वतःच सराव करून ते कॅसिओ शिकलो. हळूहळू विविध वाद्य वाजवणारी मित्र मंडळी जमत गेली आणि त्यातूनच त्यांनी ‘स्वप्न तरंग म्युझिकल ग्रुप’ सुरू केला. आज या ग्रुपमध्ये १५ कलाकार आहेत.

कोरोना काळापूर्वी नितीन यांना मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईमधून देखील बोळवण यायची. गणपती-नवरात्रीमध्ये त्यांना हमखास दीड ते दोन लाखांच्या ऑर्डर मिळत असे. वर्षभराचा विचार केला तर ८ ते १० लाख रुपयांची मिळकत होत होती. प्रत्येक कलाकाराला दोन ते अडीच लाख रुपये सुटत होते. यावर तो आपला तसेच आपल्या कुटुंबाचे पोट सहज भरत होता. परंतु कोरोनाचे नजर लागल्यागत संकट त्यांच्यावर ओढवले. सण-उत्सवांवर मर्यादा आल्या, मिरवणुकांवर बंदी आली. त्यामुळे ‘बँजो पार्टी’ बेसूर झाल्याचे नितीन सांगतात. कोरोना काळात एकही ऑर्डर मिळाली नाही. अडीच ते तीन लाखांचे बँजो पार्टीचे समान धूळ खात पडले आहे. कॅसिओ, स्निअर ड्रम, थाप ढोल, ताशा, बास सेट, रोटो सेट, ड्रम सेट, कच्ची ढोल, बुलबुल यांसारखी वाद्ये खराब होतात की काय, अशी धाकधूक त्यांना आहे. वर्षभरात येणारे विविध सण-उत्सव, लग्न समारंभ, निवडणुकांच्या मिरवणुका हा बेंजो पार्ट्यांसाठी ‘ऑन सिझन’ म्हणजे सुगीचे दिवस. सण-उत्सव कधी सुरू होईल, याकडे आमच्या नजरा लागल्या आहेत, असे नितीन सांगतात.

काम शोधता शोधता अपघात

नितीन यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. मोठ्या मुलाच्या शाळेचे शुल्क थकले आहे. ते न भरल्याने शाळेने त्याचे ऑनलाईन क्लास बंद केले. याच चिंतेत काम शोधता शोधता त्यांचा अपघात झाला. त्यात पाय मोडल्याने तीन महिने ते रुग्णालयातच पडून होते. आता पायावर त्यांना नीट उभे राहता येत नाही. पायावर उभे राहून आता कॅसिओ वाजवता येईल की नाही, ते माहीत नाही. परंतु व्हिलचेअर घेऊन वाद्य वाजवण्याचा सराव सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले.

नाव : नितीन रणखांबे

वय : ३८

पत्ता : जीटीबी नगर, रावळी कॅम्प

काम : कॅसिओ वादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT