मुंबई, 11 : महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांनी लस घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी केली होती, परंतु जेव्हा ते लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून गायब झालेले आढळले. याबाबत अनेक डॉक्टरांनी आरोग्य विभागाकडे तक्रार देखील केली आहे. अशा परिस्थितीत आता आरोग्य विभागाने केंद्राला पत्र लिहून रजिस्ट्रेशन लिंक सुरू करण्यास परवानगी मागितली आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात सुमारे 15 लाख आरोग्यसेवा कर्मचारी आहेत. आतापर्यंत सुमारे 1 दशलक्ष आरोग्य कर्मचार्यांनी कोविन ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. आता यातील काही डॉक्टर वॉक-इनद्वारे लसीकरण केंद्रावर पोहोचले आहेत, मात्र, त्यांचे नाव कोविनच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध नाही.
महत्त्वाची बातमी : कोश्यारींच्या हवाई प्रवासाला सरकारने नाकारली परवानगी, विमानात बसलेले राज्यपाल राजभवनात परतले
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, "मी स्वत: लस घेण्यासाठी केंद्रात गेलो होतो, पण कोविन लाभार्थ्यांच्या डेटा बेसमध्ये माझे नाव नाही. शिवाय, अनेक परिचित आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांची नोंदणी झाली आहे. पण, त्यांचे नाव डेटा बेसमध्ये नाही. आम्ही याविषयी तक्रार आरोग्य विभागाकडे केली आणि त्यानंतर नोंदणी (रजिस्ट्रेशन लिंक ) सुरू करण्यास सांगितले. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,आम्ही कोविन अॅपवर पुन्हा नोंदणी सुरू करण्याची परवानगी मागण्याबाबतचे पत्र केंद्राला लिहिले आहे."
महत्त्वाची बातमी : ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात महत्त्वाचा निर्णय; परिवहन आयुक्तांची शक्कल
आता यांनाही हवी लस -
सुरुवातीला, लसीच्या दुष्परिणामांबद्दल आणि संभ्रमांतून निर्माण झालेल्या कोंडीमुळे नोंदणी न केलेले आणि काही कारणास्तव लसीकरणाची वेळ चुकवणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना लस घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा नोंदणी (रजिस्ट्रेशन लिंक ) सुरु करण्याची मागणी उपस्थित केली जात आहे.
loopholes covid vaccination process in maharashtra many names missing even after registration
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.