Rahul Ahirwar motivational story 
मुंबई

Inspirational Story: जिद्द! फॅक्टरीत काम करताना गमावले दोन्ही हात; हाताच्या प्रत्यारोपणानंतर राहुलने दिली परिक्षा

Motivational story: फॅक्टरीत काम करत असताना दोन्ही हात गमावलेल्या राहुल अहिरवार या २२ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात केईएमच्या डॉक्टरांनी प्रकाशाचा किरण आणला.

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

Motivational story : फॅक्टरीत काम करत असताना दोन्ही हात गमावलेल्या राहुल अहिरवार या २२ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात केईएमच्या डॉक्टरांनी प्रकाशाचा किरण आणला.

डॉक्टरांनी मिळून त्याच्या उजव्या हाताचे प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण झाल्यानंतर आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने कला शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आणि आणि परीक्षेसाठी रायटर न घेता तीन तास पेपर लिहिला. त्यामुळे राहुलच्या जिद्दीचे डॉक्टरांनी कौतुक केले.

राहुलने बारावीची परीक्षा दिल्यावर २०१९ मध्ये फॅक्टरीत काम सुरू केले. काम करत असताना दोन्ही हात फॅक्टरीत झालेल्या अपघातात गमवावे लागले. त्यानंतर त्याचे शिक्षण आणि रोजगार दोन्हीही थांबला.

त्यामुळे हातांचे प्रत्यारोपण करून घेण्यासाठी राहुल मुंबईतील केईएम रुग्णालयात आला. केईएम रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जन विभागातील आणि इतर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून राहुलच्या उजव्या हाताचे प्रत्यारोपण केले होते.

केईएम रुग्णालयाच्या इतिहासात राहुलच्या हातांचे प्रत्यारोपण हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता. फक्त हात प्रत्यारोपणापर्यंतच मर्यादित न राहता केईएम रुग्णालयाच्या डॉक्टर आणि काही निकटवर्तीयांनी राहुलला त्याच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

त्यानुसार आता राहुलने त्याचा एमएससीआयटी हा कॉम्प्युटर कोर्सही पूर्ण केला आणि पुढील शिक्षणाची तयारी सुरू केली.

२०२२ मध्ये मध्य प्रदेशातील माग्रईतील पलेरा महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आणि परीक्षेसाठी रायटर न घेता ३ तास पेपर लिहिला. राहुल सांगतो की, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही परीक्षा स्वतः पेपर लिहून दिली.

२५ मार्चला इंग्रजी तर २९ मार्चला पूर्ण तीन तास पोलिटिकल सायन्सचा पेपर त्यानी लिहिला. आता भूगोल, सोशी लॉजी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फाऊंडेशन कोर्सचे पेपर तो देणार आहे. अजूनही लिहायला थोडा त्रास होत असून लिहिण्याचा वेगदेखील कमी आहे.

दुसऱ्या हाताचे प्रत्यारोपण

राहुलचे दोन्ही हात मशीनमध्ये गेल्याने त्याच्या एका हातावर केईएम रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर त्याने परीक्षादेखील दिली. त्याच्या दुसऱ्या हाताचे प्रत्यारोपण होणे अजूनही बाकी आहे.

पैशाची अडचण असल्याने ही शस्त्रक्रिया तातडीने करणे शक्य नसले, तरी केईएम रुग्णालय आणि रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांच्याकडून दुसऱ्या हाताच्या प्रत्यारोपणासाठीच्या मदतीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

'त्याच्या जिद्दीचे कौतुक करू तितके कमी आहे. शिक्षण पूर्ण करण्याच्या त्याच्या प्रबळ इच्छेमुळे तो लवकर बरा झाला. आता तो पहिल्या वर्षाची परीक्षादेखील देत आहे.'

- डॉ. विनिता पुरी, विभागप्रमुख, प्लास्टिक सर्जरी, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT