शहापूर ः रामचंद्र खोडके यांच्या घराच्या बांधकामाला मंगळवारी सुरुवात झाली.  
मुंबई

"त्या' आदिवासी दाम्पत्याला घराची लॉटरी

सकाळ वृत्तसेवा

शहापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याचा पाडा येथे ज्या झोपडीत बसून जेवले, त्या रामचंद्र खोडके यांच्या आदिवासी गरीब कुटुंबाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने घर बांधून दिले जात आहे. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते सोमवारी शहापूरनजीक असलेल्या वाऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या झोपडीत थांबून जेवले होते. त्याच झोपडीचा जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कायापालट होणार आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या नीलेश सांबरे, बबन दादा हरणे, हरेश पष्टे यांनी पुढाकार घेऊन हे घर बांधण्याचे जाहीर केले होते. शरद पवार यांच्यासमोर दिलेल्या वचनाची तत्काळ पूर्तता करणे दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. खोडके यांच्या घराच्या बांधकामासाठी साहित्य आले असून घरासाठीचे खड्डेही खणून झाले आहेत. 

फेब्रुवारीतच बांधकाम पूर्ण होणार 
रामचंद्र खोडके आणि पत्नी कमळ यांचा मुलगा इयत्ता दहावीत; तर मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. मोलमजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाचे कुडाचे चंद्रमौळी घर आहे. त्यांना कधी वाटलेही नसेल की, आपण कधी पक्‍क्‍या घरात राहायला जाऊ. घर बांधण्याचे काम सुरू असून फेब्रुवारी महिन्यात बांधकाम पूर्ण झालेले असेल, असे जिजाऊ संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

"Lottery to the house of that 'tribal couple." 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

Central Railway: कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई-मडगावदरम्यान गणपती विशेष गाड्या; कुठून, कधी धावणार ट्रेन?

‘फुलों का तारों का’ गाण्याची भन्नाट गोष्ट! लता मंगेशकरांनी काढला चक्क 10 वर्षांच्या मुलाचा आवाज

Marathi News Live Updates : नेपाळमधील महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर; ओवेसींकडून मदतीचे आवाहन

SCROLL FOR NEXT