NCP-Shivsena
NCP-Shivsena Esakal
मुंबई

ठाण्यात आघाडीमध्ये मिठाचा खडा? शिवसेनेत नाराजी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महाविकास आघाडातील (Maha vikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांची महापालिका निवडणुकीस (Thane municipal corporation) एकत्रित सामोरे जाण्याची धारणा आहे; मात्र बुधवारी पार पडलेल्या ठाण्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण (Shanu pathan) यांनी महापौरांच्या (Mayor) डायसवर येऊन थेट लोटांगण घातल्याने शिवसेनेच्या (Shivsena disappointment) गटात नाराजी आहे. यामुळे पालिका निवडणुकीत आघाडीपूर्वीच दोन्ही पक्षांत दरी निर्माण झाली असून गुरुवारी आघाडीसाठी होणारी पहिलीच बैठक रद्द (First meeting cancelled) झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर पडला नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. (Maha vikas aghadi may in trouble on thane municipal election as shivsena disappointed due to ncp)

ठाणे पालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी, अशी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची धारणा आहे; मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विविध कारणांवरून खटके उडत आहेत. ठाणे पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या डायसवर येऊन लोटांगण घातल्याने राष्ट्रवादीकडून आघाडीत बिघाडी होत असल्याचे संदेश दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये गेला.

सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाचे पडसाद गुरुवारी होणाऱ्या ठाणे पालिकेसाठीच्या आघाडीच्या नियोजित बैठकीवर दिसून आले. शानू पठाण यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या महापौरांनी ही बैठकच रद्द केली. शिवसेनेच्या गोटात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी असल्याने ठाण्यात आघाडी होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

यापूर्वीही लसीकरणासाठी कॅम्प देण्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर ठाण्यात आघाडी करण्यासाठी तसेच यासंदर्भात बैठका घेण्यासाठी आनंद परांजपे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती; मात्र शानू पठाण यांच्या भूमिकेमुळे पालिका निवडणुकीच्या आघाडीत मिठाचा खडा पडला की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

नियोजित बैठकीची कल्पना नाही

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचा राग शिवसेनेवर नसून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यपद्धतीवर असल्याचे स्पष्ट केले. आघाडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतले जात असून आमच्या स्तरावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही; मात्र आयुक्त जर स्वतःला महासभेपेक्षा वरिष्ठ समजत असतील तर आम्ही आयुक्तांना घेराव घालायलाही कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच नियोजित बैठकीसंदर्भात आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT