मुंबई

कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा

सकाळवृत्तसेवा

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं मोठं थैमान घातलं आहे. देशभरातला कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहिल्यावर सर्वाधिक प्रार्दुभाव हा महाराष्ट्रात झाला आहे. म्हणूनच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यानुसार सरकारकडूनही वेळोवेळी नवनवीन बदल करण्यात येत असतात. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

यानंतर आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. डॉक्टरांच्या या टास्क फोर्समध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असेल. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे. या टास्कफोर्सची टीम एक नियमावली ठरवणार आहे. या नियमावलीत राज्यभरात कशा पद्धतीनं रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले पाहिजे हे नमूद केलं असेल.

रुग्णांना कोणकोणते आयुर्वेदिक औषध वापरले पाहिजे आणि ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 

'या' नव्या ठिकाणी आयशोलेशन बेड्स तयार

महालक्ष्मी रेसकोर्समध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगचा भाग मोकळा आहे. त्यामुळे  रेसकोर्सच्या पार्किंगमध्ये पालिकेनं 200 बेड्स आयसोलेशनची सुविधा केली आहे. रेसकोर्सपासून हाकेच्या अंतरावर असलेलं नेहरु सायन्स सेंटर आणि नेहरु प्लॅनेटेरियम येथे 200 आणि 100 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. जे. जे. हॉस्पिटलजवळील रिचर्डसन क्रुडास कारखान्यात 200 आयसोलेशन बेड्स जोडल्या आहेत. माहिम येथे नेचर पार्क येथे 600 बेड्सची सुविधा केली असून MMRDA मैदानावर लवकरच 500 बेड्सचा वेगळा वॉर्ड असणार आहे. 

याआधी प्लाझ्मा थेरपीचा वापर 

राज्यातली स्थिती पाहता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. याआधीही लिलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.

maharashtra government gives green signal for ayurvedic task force for the treatment of  covid 19 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT