Jitendra avhad Sakal media
मुंबई

म्हाडा रहिवाशांना मोठा दिलासा! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

नरेश शेंडे

मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) अभय योजनेची घोषणा करुन म्हाडा सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना (Mhada society People) मोठा दिलासा दिला आहे. १ एप्रिल १९९८ ते २०२१ पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात येणार आहे.असा निर्णय गृहराज्य मंत्रालयाने (Jitendra Awhad) घेतला आहे. त्यामुळं म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना अभय योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्‍या तब्बल १ लाख ८१ हजार रहिवाशांना या अभय योजनेचा लाभ होणार आहे. तसंच म्हाडात राहणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन प्रणालीद्वारे (Online Billing Facility) घरातुनच सेवा शुल्क भरता येणार असल्याने म्हाडा रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad Announce Abhay yojana For MHADA People)

म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्यात येतील, असा निर्णय राज्याचे गृहराज्य मंत्री जिंतेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याची माहिती शिवसेनेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यांमुळं राज्यात राजकीय वादळं उठलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही झाला होता.

"गेली २१-२२ वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते त्यांच्यासाठी गृहराज्य निर्माण मंत्रालयाने अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार म्हाडा रहिवाशांच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रहिवाशांनी थकीत सेवा शुल्क एकत्रित न भरता ५ वर्षांमध्य़े १० हप्ते भरावेत.अशी सवलत म्हाडात राहणाऱ्या रहिवाशांना दिली आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्‍या १ लाख ८१ हजार रहिवाशांना अभय योजनेचा लाभ होणार आहे. म्हाडा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन प्रणालीद्वारे घरातुनच सेवा शुल्क भरता येणार आहे. तसंच रहिवाशांना म्हाडात जाऊन रांगेत बील भरणं बंद होईल. म्हाडाच्या 4973 इमारतीत 146382 रहिवासी राहतात, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे." अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT