Mumbaikars
Mumbaikars Social-Media
मुंबई

Mumbai Unlock: नवे नियम जाहीर; पाहा काय सुरू, काय बंद?

समीर सुर्वे
  • लग्न सोहळ्यासंबंधीच्या नियमात महत्त्वाचा बदल, लोकल रेल्वेबद्दलही निर्णय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनबद्दलची (Maharashtra Lockdown) नवी नियमावली (New Guidelines) जाहीर केली. यातील काही निकषांवरून मुंबईचा (Mumbai) समावेश नक्की कोणत्या टप्प्यात (Level) या बद्दलचा संभ्रम होता. पण मुंबईचा समावेश हा सध्या तिसऱ्याच टप्यात (Third Level) आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत, तपशीलवार नियमावली (Detailed Notification) मुंबई महापालिका लवकरच जाहीर करेल, असंही महापौरांनी सांगितलं होतं. त्यानुसार, मुंबई पालिकेने काय सुरू आणि काय बंद याची नियमावली जाहीर केली. महत्त्वाची बाब म्हणजे, सकाळी राज्य सरकारने महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती, पण संध्याकाळी मात्र पालिकेने ही परवानगी नाकारली. (Maharashtra Lockdown Mumbai Unlock BMC Notification Local Train Marriage Rules Hotels Malls Salon services)

अनलॉकमधील काही महत्त्वाचे मुद्दे-

  • रात्रीची संचारबंदी कायम (Night Curfew) - रात्रीची संचारबंदी कायम राहाणार आहे. संध्याकाळी 5 नंतर मुंबईत संचारबंदीला सुरूवात होईल. तसेच, सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदीही कायम आहे.

  • बबल शुटिंगला परवानगी (Movie, Daily Soaps Shooting) - बायो बबलमधील चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र, संध्याकाळी 5 वाजल्यानंतर फक्त इनडोअर शूटींगला परवानगी देण्यात आली आहे.

  • कार्यालये, उद्योग (Offices, Business) - खासगी व सरकारी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. उत्पादने निर्यात होणाऱ्या लघु व मध्यम उद्योग, अत्यावश्‍यक सेवांशी संबंधित उद्योग आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, निर्यात होणारी उत्पादने, अत्यावश्‍यक सेवा वगळता असलेल्या उद्योगांना 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी व कामगारांची वाहतूक स्वत: करायची आहे.

मुंबईत काय सुरु, काय बंद? (New Guidelines)

  • दुकाने- सर्व दुकाने, आस्थापने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापने दुकाने शनिवार, रविवार बंद राहणार.

  • उपहारगृह- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. संध्याकाळी 4 नंतर फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी

  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग आणि मॉर्निंग/इव्हनिंग वॉक- पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी

  • मैदानी खेळ- पहाटे 5 ते सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत परवानगी

  • खासगी कार्यालये (अत्यावश्‍यक सेवा वेगळता)- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

  • सांस्कृतिक, सामाजिक, करमणूक कार्यक्रम- क्षमतेच्या 50 टक्के संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू पण शनिवार रविवार बंदी.

  • विवाह- 50 व्यक्तींची उपस्थिती, दोन तासांची अट नाही.

  • अत्यंसस्कार- 20 माणसांची उपस्थिती

  • बांधकाम- बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असल्यास किंवा बाहेरुन कामगार आल्यास संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी

  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के परवानगी

  • ई-कॉमर्स- सर्व सेवा पुरवण्यास परवानगी

संपादन- विराज भागवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT