मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव नाही. महाराष्ट्रातही कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. अशात अनलॉकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेही सणवार साजरे केलेले नाहीत. आता अनलॉक सुरु असताना आता नवरात्रीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.
असा साजरा करावा लागणार नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा :
महत्त्वाची बातमी : राज्याच्या संकाटात आणखी भर! कोरोनानंतर ‘कांगो फिवर? उपचार, निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यूची शक्यता
रावणदहन करा पण गर्दी ना करता :
सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दसऱ्याला रावणदहन कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा होणार नाही याची काळजी घेऊन रावण दहन कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे.
Maharashtra state government issued guidelines for navaratri and dussehra
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.