मुंबई

मोठी बातमी : ठाकरे सरकारचा भाजपच्या बड्या आमदाराला 'जोर का झटका'

सकाळ वृत्तसेवा

आज महाविकास आघाडीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची पहिल्यांदाच बैठक पार पडली. अशात महाविकास आघाडीकडून भाजपाला धक्यांवर धक्के दिले जातायत. असाच एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलाय. यामध्ये भाजप आमदाराकडून एका महत्त्वाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आलीये. महाविकास आघाडीकडून सिडकोच्या अध्याकांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सोडकोच्या अध्यक्षपदावर आता नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. आजच हा निर्णय झाल्याचं समजतंय. 

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष होते. दरम्यान आता महाविकास आघाडीकडून सिडकोच्या अध्यक्षपदावरून प्रशांत ठाकूर यांना हटवण्यात आलंय. प्रशांत ठाकूर हे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. 


महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचं आपल्या समोर  आलंय. अशात आता फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या नियुक्त्या देखील रद्द करण्यात येत असल्याचं समोर येत. सर्व महत्त्वाच्या पदांवरून भाजपच्या नेत्यांना हटवण्याचे निर्णय घेतले जातायत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घेतलेले अनेक निर्णय महाविकास आघाडीकडून रद्द केले आहेत.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mahaviks aaghadi cancelled appointment of cidco president prashant thakur  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात आणखी एक भोंदूगिरीचा प्रकार ! "प्रगती करायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठव", तथाकथित आध्यात्मिक गुरूची तरुणीकडे भलतीच मागणी

Latest Marathi News Live Update : समुद्रात ९ मच्छिमार अडकले, सुटकेचे प्रयत्न सुरू

Kolhapur Vaibhavwadi Railway : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे जोडणीचा मार्ग बदलणार? मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची महत्त्वाची माहिती; तांत्रिक, भौगोलिक अडचणींमुळे निर्णय

Pratap Sarnaik: मराठी न आल्यास थेट बॅज निलंबित, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Gutkha Smuggling Accident : गुटखा तस्करीतील भरधाव कारच्या धडकेत भादोलेचा 25 वर्षीय तरुण ठार; पुणे-बंगळूर महामार्गावर 'बालभारती' समोर अपघात

SCROLL FOR NEXT