मुंबई

प्रवाशांनो.. सावधान!!! 14 मेल-एक्‍सप्रेस रेल्वे रद्द, पाहा यादी

'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध

कुलदीप घायवट

कोरोना संसर्ग वाढत असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील 14 एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्यानिमित्त रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र, यंदा दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. परिणामी, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी संख्या कमी असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने मेल-एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

1. गाडी क्रमांक 02147 दादर- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष एक्‍सप्रेस 7 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02148 साईनगर शिर्डी - दादर साप्ताहिक विशेष एक्‍सप्रेस 8 मेपर्यंत रद्द.

2. गाडी क्रमांक 01131 दादर- साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01132 साईनगर शिर्डी- दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द

3. गाडी क्रमांक 01404 कोल्हापूर- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01403 नागपूर- कोल्हापूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द

4. गाडी क्रमांक 01139 मुंबई- गदग विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01140 गदग - मुंबई विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द

5. गाडी क्रमांक 02041 पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02042 नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत रद्द

6. गाडी क्रमांक 02239 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02240 अजनी - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 16 मेपर्यंत रद्द केल्या आहेत.

7. गाडी क्रमांक 02117 पुणे - अमरावती साप्ताहिक एक्सप्रेस 12 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02118 अमरावती - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द

8. गाडी क्रमांक 02036 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02035 पुणे - नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द

9. गाडी क्रमांक 01137 नागपूर - अहमदाबाद साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 12 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01138 अहमदाबाद - नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द

10. गाडी क्रमांक 02223 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत रद्द

11. गाडी क्रमांक 01041 दादर - साईनगर शिर्डी आठवड्यातील चार दिवस  8 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01042 साईनगर शिर्डी - दादर आठवड्यातील चार दिवस विशेष 9 मेपर्यंत रद्द

12. गाडी क्रमांक 01027 दादर - पंढरपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01028 पंढरपूर-दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द

13. गाडी क्रमांक 02235 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद विशेष एक्सप्रेस  28 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02236 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस 29 मेपर्यंत रद्द

14. गाडी क्रमांक 09125  सूरत - अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 09126 अमरावती - सूरत द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT