मुंबई

कान्हेरी, घारापुरी लेण्यांना नवी झळाळी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऊन-पावसाचा मारा आणि समाजकंटकांकडून विटंबना सहन करत उभ्या असलेल्या मुंबईतील लेण्यांना सहा महिन्यांत नवी झळाळी मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे बोरिवली येथील कान्हेरी आणि अरबी समुद्रातील घारापुरी येथील एलिफंटा लेण्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - ड्रायव्हिंग स्कूलमधील गैरप्रकारांना चाप, वाचा संपुर्ण बातमी

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) वैज्ञानिक विभागाने कान्हेरी आणि घारापुरी लेण्यांच्या संवर्धन कार्याला परवानगी दिली आहे. शास्त्रीय पद्धतीने, योग्य रसायनांचा वापर करून या लेण्यांना पुन्हा झळाळी देण्यात येईल. या कामासाठी तीन ते सहा महिने लागतील, असे एसआयचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरावरील कान्हेरी लेणीसमूह १०९ प्रवेशद्वारांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठ आणि विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांतील अभ्यासकांनी तेथे आणखी काही लेणी शोधून काढली होती. ही बौद्ध लेणी इसवीसनपूर्व पहिले शतक ते इसवीसनानंतर १० वे शतक या काळात साकारण्यात आली. या ठिकाणी दगडातील कोरीव मूर्ती, स्तूप व काही कोरीव लेखही आहेत; काही मूर्ती रंगीत आहेत.

मुंबईजवळ घारापुरी बेटावरही लेणी आहेत. ब्रिटिशांनी पहिल्यांदा ही लेणी पाहिली तेव्हा तेथे हत्तीचे दगडात कोरलेले शिल्प आढळले. त्यावरून या लेण्यांना ‘एलिफंटा केव्ह्‌ज’ असे नाव देण्यात आले. हे हत्तीशिल्प मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ठेवण्यात आले आहे. 

काय होणार?

  • शिल्पांवरील धुळीच्या थराची सफाई 
  • कीटकांपासून संरक्षणासाठी 
  • रसायनांचा वापर
  • कमकुवत भाग, शिल्पांच्या रंगांचे संवर्धन

यांचेही संवर्धन आवश्‍यक

  • बोरिवलीत मंडपेश्‍वर येथील आठव्या शतकात कोरण्यात आलेल्या लेण्यांत शंकर आणि बुद्धाच्या प्रतिमा आहेत. नंतरच्या काळात ब्रह्माला समर्पित कोरीव कामही करण्यात आले आहे.
  • अंधेरी येथे महाकाली किंवा कोंडीविटा ही बौद्ध लेणी आहेत. त्यांचे काम इसवीसनापूर्वी पहिल्या शतकापासून इसवीसनाच्या सहाव्या शतकापर्यंत सुरू होते.
  • जोगेश्‍वरी येथील बौद्ध लेणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT