Man attacks School Headmaster over teacher wife increment Mumbai Crime News rak94 
मुंबई

Mumbai Crime : शिक्षक पत्नीचा पगार वाढेना म्हणून पतीचा मुख्याध्यापकावर हल्ला; रेल्वे स्टेशनजवळ गाठलं अन्....

Mumbai Crime Latest News : या हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : - शिक्षीका असलेल्या पत्नीचं इन्क्रिमेंट होत नसल्याच्या रागातून पतीने रागाच्या भरात शाळेच्या मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डोंबिवली जीआरपी पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख याला अटक केली आहे. शाळेच्या सर्व्हीस बुकमध्ये नोंद न झाल्याने शिक्षिकेचे इन्क्रीमेंट होत नव्हते. या कारणावरुन शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यात नेहमी वाद होत होता.

मिनाज शेख या खारबावला येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शेख यांची सर्व्हीस बुकात नोंद केली जात नव्हती. त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट होत नव्हते. यावरुन शेख आणि मुख्याध्यपक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत हाेता. अनेक वेळा विनंती करुन देखील शेख यांची विनंती मान्य केली जात नव्हती. शेवटी त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला. त्याला या गोष्टीचा राग अनावर झाला.

शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरुव यांना दिवा वसई मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनजवळ गाठले. तूला जीवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यानंतर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

भागवत गुरव हे कल्याणला राहणारे असून ते दररोज कल्याण ते खारबावला असा प्रवास करतात. त्यांच्या या प्रवासाच्या वेळेची शकील शेख याला माहिती होती. ती वेळ साधतच शकीलने रेल्वे रेल्वे स्टेशनवर गुरव यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर शकीलने तेथून पळ काढला. परंतु डोंबिवली जीआरपी पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालत फरार आरोपी शकील शेखला अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT