मुंबई

"घरच्यांची आठवण येतेय, हे घर आता मला खायला उठलंय", असं म्हणत त्याने...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे आपलं घर सोडू इतर शहरांमध्ये गेलेले विद्यार्थी, मजूर किंवा इतर लोकं अडकून पडले आहेत. त्यामुळे काहींनां घरी जाण्याची इतकी ओढ आहे की त्यांनी पायी प्रवास सुरु केला आहे. मात्र काहींना घरी जाणं किंवा घरच्यांना भेटणं शक्य होत नाहीये. असाच एक मन हेलावून टाकणारा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. 

सरकारनं अचानक लॉकडाऊन कारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अडकून पडलेल्या एका इंजिनिअर तरुणानं घरच्यांची आठवण येते मात्र त्यांना भेटू शकत नाहीये म्हणून स्वतःचं जीवन संपवलं आहे. सुरज सुर्वे असं या इंजिनिअर तरुणाचं नाव आहे. २७ वर्षांचा सुरज हा नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमध्ये राहणारा. 

सूरज हा लॉकडाउन सुरु झाल्यापासून एकटाच घरी राहत होता. त्याचे सर्व कुटुंबीय गावी राहतात. कुटुंबीय गावी अडकल्यामुळे सूरजला गावी जाता आलं नाही. त्यामुळे लॉकडाउन लवकरच संपेल आणि आपल्या घरच्यांना भेटता येईल या आशेवर तो दिवस काढत होता. मात्र आता एकटं राहिल्यामुळे सुरजचा सुरजची घुसमटत होत होती. त्याला त्याच्या घरच्यांची प्रचंड आठवण येत होती. तर त्यांना भेटता येत नव्हतं. त्यामुळे त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं.  

"हे घर मला खायला उठलंय":

सुरजनं गळफास लावून स्वतःला संपवण्याआधी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आपण एकटं राहतो आहे आणि घरच्यांनाही  भेटू शकत नाही म्हणून आत्महत्या करत आहे असं लिहिलं आहे.

"खूप दिवस झाले एकटं राहतोय या घरात. हे घर मला एकट्याला खायला उठलं आहे. सगळ्यांची खूप आठवण येत आहे. आठवण आली की एकटा रडत बसतो. बाहेरून कितीही खूश दिसत असलो तरी आतून खूप खचून गेलो आहे. फोनवर तरी किती बोलणार. जितकं जास्त फोनवर बोलायचो तितकी जास्त आठवण यायची आणि मग मी रडत बसायचो. घरच्यांपासून किती दिवस दूर राहावं लागणार आहे हे माहिती नाहीये. त्यामुळे मी माझ्या इच्छेप्रमाणे आत्महत्या करत आहे",असं त्यांनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. 

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, पोलिस यावर पुढील तपास  करत आहेत.

man from navi mumbai ends his life after staying in home alone form long time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT