मुंबई - कोरोनाच्या संकटाच्या काळात आपण सर्वच जण या व्हायरस विरुद्धच्या युद्धात दोन हात करतोय. काही जण घरीच थांबून या कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करतायत तर काही जण आपल्याला घरी काही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टर्स आणि पोलिस रस्त्यावर जिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे तिथे स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम करतायत. अशात सर्व डॉक्टर्स आणि पोलिसांनाही सेवा देणारे ST कर्मचारी देखील स्वतःच्या जीवावर उदार होऊन दररोज काम करतायत. पोलिस आणि डॉक्टर्स, परिचारिका यांच्याबद्दल आपण अनेक बातम्या ऐकल्या वाचल्या आहेत. मात्र ही बातमी आहे एका अशा माणसाची जी वाचून तुमच्या अंगावर काटा येईल.
बातमी आपल्या देविदास राठोड यांची. देविदास राठोड हे एक ST कर्मचारी आहेत. ST मध्ये ते कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. देविदास राठोड हे मुंबई सेंट्रल ते पालघर या बसवर ड्युटी करतात. देविदास राठोड हे अत्यावश्यक सेवेत काम करत असल्याने त्यांना दररोज ड्युटीवर वेळेत पोहोचावं लागतं.
अशात कामाला उशीर करूनही चालत नाही. रविवारी कामावर जात असताना त्यांना लॉक डाऊनमुळे कोणतही वाहन मिळालं नाही. म्हणून देविदास यांनी थेट पळत २१ किलोमीटरचे अंतर कापून आपला डेपो गाठला. महत्त्वाची बाब म्हणजे परतीचा प्रवास देखील त्यांना तसाच धावत पळत केलाय.
देविदास राठोड ST कंडक्टर आहेत. ते पालघर ते मुंबई सेन्ट्रल या बसवर कार्यरत असतात. या बसमध्ये अनेक डॉक्टर्स आणि परिचारिका असल्याने त्यांना वेळेत पोहोचणं भाग असतं. अशात रविवारी त्यांना कोणतीही वाहतुकीची सोय उपलब्ध न झाल्याने २१ किलोमीटर अंतर धावून आपला डेपो गाठला. यानंतर देविदास यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
man walked 21 km just just to reach St bus depot during lock down
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.