manisha kayande and standup  
मुंबई

स्टँडअप कॉमेडी शोसाठी कठोर सेन्सॉरशिप हवी; आमदार मनीषा कायंदे यांची मागणी..

कृष्ण जोशी

मुंबई: समाजमाध्यमांवर प्रसिद्धीचे वेड लागलेल्या तरुणाईला आपण कोणत्या व्यक्तिविषयी काय बोलत आहोत याचा ताळतंत्र राहिलेला नाही. त्यामुळे नुकताच एका कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान केला, अशा स्थितीत या स्टँडअप कॉमेडी शो वर बंदी घालावी किंवा त्यांच्यावर सेन्सॉरशिपची बंधने लादावीत, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआ हिला अटक करावी अशी मागणी त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केली आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आज स्टॅन्ड अप कॉमेडी शो मध्ये अनेक थोर विचारवंत, महिला, राष्ट्रपुरुष वा अनेक वेळा एखाद्या समाजाची नाहक बदनामी होत असते. 

शॉर्टकट मार्गाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टँड अप कॉमेडीकडे आजचा तरुण वर्ग वळू लागला आहे. अगदी १६ -१७ वर्षांची मुले युट्युब फेसबुक व इतर समाजमाध्यमांच्या साह्याने प्रसिद्धीसाठी स्टँड अप कॉमेडीचा आसरा शोधू लागली आहेत. त्यामुळे या प्रकारावर कायदेशीर नियंत्रण हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

वास्तवात हे कॉमेडी शो करणाऱ्या विद्यार्थ्याचे वाचन व चिंतन खूपच कमी असते. त्यामुळे टाळ्या मिळवण्यासाठी ही मुले अपुऱ्या माहितीच्या आधारावर इतिहासातील घटनांवर विनोदनिर्मिती करतात व कळत नकळत यांच्याकडून राष्ट्रपुरुष तर कधी एखाद्या समाजाचा जाहीर अपमान होत असतो. 

कधी कधी तर रामायण व महाभारत ग्रंथातील व्यक्तींवर कॉमेडी होताना दिसते. आज मुंबई पुण्यातील अनेक खाजगी हॉटेल्समध्ये हे स्टॅन्ड अप कॉमेडी शो तिकीट घेऊन आयोजित केले जातात. परंतु त्यातील विनोदांवर कोणाचेच नियंत्रण नसते, त्यामुळे या कार्यक्रमांवर सेन्सॉरशिप लावणे गरजेचे झाले आहे, असे म्हणणे कायंदे यांनी मांडले आहे. 

कोणतेही नाटक, चित्रपट आदींना सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. तोच नियम या स्टँडअप कॉमेडी शो साठी लागू करावा. कोणीही उठून कोणताही जाहीर कार्यक्रम करावा, अशी बेबंदशाही होऊ देऊ नये. या शो साठी देखील कायदे-नियम करावेत, अशी मागणीही कायंदे यांनी केली आहे.

 संपादन: अथर्व महांकाळ 

manisha kayande seeks censorship for standup comedy 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's Asia Cup Rising Stars : भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक; महाराष्ट्राची पोरगी चमकली, बांगलादेशला मात दिली

Budget Session: अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम! बहिष्कार, सरकारला 6 गंभीर मुद्द्यांवर घेरण्याची तयारी, काय आहे विरोधकांचा प्लॅन?

Nashik Municipal Corporation : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! नाशिककरांनाही खरेदी करता येणार महापालिकेचे 'हरित कर्जरोखे'

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, मंत्री झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी

Ozar Bus Stand : ओझर बसस्थानकात अखेर पाच वर्षांनंतर लालपरीची ‘घरवापसी’! आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झुकले

SCROLL FOR NEXT