मुंबई

मोठी बातमी: मनसुख हिरेनला मारण्यासाठी केला 'या' औषधाचा वापर

पूजा विचारे

मुंबई: मनसुख हिरेनला मारण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या क्लोरोफॉर्म लावल्यानंतर बेशुद्ध मनसुखच्या तोंडात मोठ्या प्रमाणात रुमाल कोंबले, अशी माहिती मिळतेय. त्यानंतर मनसुखला खाडीत फेकले. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार नोव्हेंबर २०२० मध्ये सचिन वाझेंनी विकत घेतली होती, अशी माहिती मनसुखचा भाऊ विनोदनं ATS ला दिली आहे. त्यामुळे ही कार वाझेंनी  पोलिसांच्या अनेक कारवाईमध्ये वापरल्याचा संशयही ATSला आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये ती कार पुन्हा वाझेंनी मनसुखला आणून दिली.  गुन्हा घडल्यानंतर ही कार मी वापरत नसल्याचे पोलिसांना सांगण्यासाठी ही मनसुखवर वाझेंनी दबाव टाकला असल्याचंही समजतंय. 
 
प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर पोलिस अधिकाऱ्यांनी मनसुखला चौकशीला बोलावू नये म्हणून पोलिसांची आणि पत्रकारांची तक्रार करण्यास वाझेंनी मनसुखला सांगितले, अशी माहिती समोर येतेय.  CIU पथकाला बार आणि हॉटेलवर कारवाईचे अधिकार नसताना, गुन्हा घडला त्या ठिकाणी आपण उपस्थित नव्हतो हे दर्शवण्यासाठीच वाझेंनी डोंगरीतील कारवाई केल्याचा संशयही ATSला आहे. 

मनसुखच्या हत्येनंतर त्याची ओळख पटू नये म्हणून अंगावरील सर्व मौल्यवान वस्तू काढून मनसुखची हत्या लुटीतून झाल्याचा बनाव आरोपींनी रचला. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुखच्या दुकानातील CCTV वाझेंच्या पथकातील पोलिसांनी २७ तारखेलाच काढून नेत त्या ठिकाणी नवीन DVR  आणून लावला. जो DVR   मनसुखनेच बसवला होता. 

मनसुखच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच 4 मार्चला वाझे संपूर्ण दिवस त्यांच्या कार्यालयात होते असे त्यांनी सांगितलं. मात्र सचिन वाझे यांचं लोकेशन तपासले असता. वाझे दुपारी चेंबूर MIDC मध्ये होते. वाझे त्या दिवशी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी चेंबूरमध्ये नेमकं कोणाला भेटायला आले होते. याचाच आता शोध सुरू आहे.

ज्या रात्री मनसुख बेपत्ता झाले. त्यावेळी तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन येईल याची पूर्व कल्पनाही वाझेनं मनसुखला दिली होती. वाझे या प्रकरणात मनसुखला अटक होण्यास सांगून बेलवर बाहेर काढण्याचे आश्वासन देत होते. मात्र मनसुखच्या पत्नीला हे मान्य नव्हतं. म्हणूनच वाझेनं मनसुखला त्यांच्या पत्नीला घराबाहेर पडताना क्राईम ब्रांन्चच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावलं आहे असं सांगण्यास, सांगितलं होतं. अशी माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. 

Mansukh hiren case accused used Chloroform Sachin waze ats

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT