dengue 
मुंबई

रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांवर डेंग्यूची टांगती तलवार; अनेक ठिकाणी आढळल्या अळ्या...

प्रशांत कांबळे

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ वर्कशॉपमध्ये अनेकठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहे. रेल्वे इंजिनचे काम करत असलेल्या ठिकाणीच अळ्या असल्याने कोरोनाासोबतच आता वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर मलेरिया, डेंग्यूचे संकट उभे ठाकले असल्याचा आरोप लोअर परळचे शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबुरकर यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने लोअर परळ वर्कशॉप मध्ये सुरूवातीला 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर 30 टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा प्रकार शुक्रवारी पुढे आला आहे. वर्कशॉपमध्ये अनेक ठिकाणी सांडपाण्यात शेकडो अळ्या दिसून येत आहे. 

त्यामुळे लोअर परळच्या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यासोबतच वर्कशॉप मध्ये जागोजागी पाणी साचले असून कॅन्टीनची समस्या आहे. पालघर परिसरातून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना येण्यासाठी पहाटेच्या लोकलने यावे लागत असल्याने घरून डबा आणणे अशक्य होत आहे. त्यामुळे वर्कशॉपमधील कामगारांना पॅकिंगचे जेवण सुद्धा देण्यात यावे, त्यासोबतच स्वच्छता ठेवण्यात यावी, अशी मागणी आशिष चेंबुरकर यांनी केली. यासंदर्भात लोअर परळचे मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक  तरूण हुरीया यांच्याशी संपर्क केला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

विकास दुबे चकमकीवर चित्रपट? मनोज वाजपेयी साकारणार भूमिका ?
 

13 वर्ष या वर्कशॉप मध्ये काम केले आहे. त्यामुळे रेल्वे कामगारांच्या समस्यांची जाणीव आहे. आज वर्कशॉपची पाहणी केली असता तेथे घाणीचे सामाज्र असून रेल्वेने त्वरीत स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात. 
- आशिष चेंबुरकर, विभाग प्रमुख, लोअर परेल

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT