fire-brigade 
मुंबई

कंटेन्मेंट झोनमधील फवारणी उठतेय अग्निशमन दलातील जवानांच्या जीवावर... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईवर कोरोनाचे सावट गडद होत असताना कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. आरोग्य आणि पोलिसदलातील कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. त्यासोबतच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. एखाद्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी पालिकेकडून अग्निशमन दलातील जवानांची मदत घेतली जाते.  

अग्निशमन दलातील जवानांनाकडून कंटेन्मेंट झोनमध्ये नियमित निर्जंतुकीकरण केले जाते. त्याशिवाय ज्या इमारतीत रुग्ण आढळला आहे, त्यासंपूर्ण इमारतीचेही निर्जंतुकीकरण केले जाते. कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली हीच फवारणी जवानांच्या जिवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. 

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील 11 कामगारांचे आतापर्यंत कोरोनामुळे निधन झाले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अग्निशमन दलातील 35 जवानांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. गवालिया टॅंक येथील एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे 34 अग्निशमन केंद्रांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे काही जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये जंतूनाशक फवारणी करणे जवानांच्या जिवावर बेतत असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबईत सुमारे 2500 कंटेन्मेंट झोन (आता 644 सामूहिक) आहेत. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन धारावी परिसरात आहेत. तेथे जंतूनाशक फवारणी करताना अनेक जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. दरम्यान, भायखळा येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील क्वारंटाईन केंद्रात बाधित जवानांसाठी 30 खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी प्रभात रहांगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT