Maratha reservation andolan Victory manoj Jarange Patil News 
मुंबई

Manoj Jarange: आंदोलन संपलं आता पुढे काय? जरांगेंनी स्पष्ट केली पुढची दिशा

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणविषयक सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर मनोज जरागेंचं आंदोलन आज अखेर संपलं. पण आता पुढे काय याबाबतची दिशाही जरांगेंनी स्पष्ट केली आहे. विजयी सभेत बोलताना त्यांनी आपली पुढची भूमिका मांडली. (maratha reservation movement is over what next manoj jarange explained next plan)

मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू देखील पहायला मिळाले. जरांगेंनी आंदोलकांना गावाकडं परतण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत गावाकडे जाऊन गुलाल उधळावा आणि दिवाळी साजरी करावी असेही ते म्हणाले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व आंदोलक आपापल्या वाहनांकडं परतत आहेत. यावेळी जल्लोष करत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत परतीच्या वाटेवर निघाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

आता पुढे काय?

आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर आता पुढे काय करायचं? याबाबतही जरांगे म्हणाले, सगळ्यांनी गाड्या सावकाश चालवायच्या आहेत. आपण आपल्या गावाकडं गेल्यानंतर काय करायचं तो जल्लोष करायचा आहे. आंतरवालीत बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय असेल? पुढे काय करायचं? यासाठी चर्चा होईल. (Latest Marathi News)

फक्त गाड्या सर्वांनी सावकाश चालवायच्या, जेवणं करुन सावकाश निघायचं आहे. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार. मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचा आहे, अशा शब्दांत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जर धोका झाला तर...

तसेच बलिदान दिलेल्या सर्व बांधवांचं स्वप्न साकार झालं आहे. तसेच पुढे या आरक्षणात काही अडचणी झाल्या तर त्या सोडवायला मी सर्वात पुढं राहिलं. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात आगोदर मुंबईला आझाद मैदानात मी उपोषणाला आलोच म्हणून समजा, असं आश्वासनही यावेली मनोज जरांगे यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT