uber taxi
uber taxi 
मुंबई

अस्लम भाई सबमरीन से आरैले हैं..!

वृत्तसंस्था

ओला किंवा उबेर सारख्या ट्रारन्सपोर्ट सर्व्हिस अनेकजण वापरतात. काही मिनीटात गाडी दारात हजर होत असल्याने अनेक जण या सुविधेचा वापर करतात. मात्र कधीकधी या सिस्टीमध्ये गोंधळ होतो. कधी अधिकचे पैसे दाखवणे किंवा कधी कुठेतरी भलतीकडेच लोकेशन दाखवणे असे झाल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आले असतील. मुंबईमधील एका उबेर युझरबरोबर असेच काहिसे झाले आहे. त्याने एक स्क्रीनशॉर्ट फेसबुकवर शेअर केला असून, हा स्क्रीन शॉर्ट चांगलाच व्हायरल झाला आहे. या स्क्रीन शॉर्टमध्ये अस्लम हा मारुती सुझूकी वॅगनआर गाडी घेऊन चक्क अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यापासून अनेक किलोमीटर आतमध्ये असल्याचे दिसत आहे. नाकाशावरील उबेर कॅबचे हे जगावेगळे लोकेशन हुसैनने फेसबुकवर शेअर करत त्याला 'अस्लम भाई सबमरीन से आरैले हैं' अशी कॅप्शन त्याला दिली आहे. त्यामुळे हा मजेदार स्क्रीनशॉर्ट चांगलाच व्हायरल झाला आहे. 

असे होण्यामागे चालक आलेली रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्यात घाई करत असल्याचे बोलले जाते. तर तांत्रिक बिघाड किंवा बॅकएण्डला असलेल्या गोंधळामुळे अशा चुका घडतात. त्यामुळे निश्चित स्थळाऐवजी टॅक्सीचे लोकेशन भलतीकडेच दाखवले जाते. अनेकदा नकाशात ते अशा जागी असते जिथे टॅक्सी पोहचू शकत नाही. असंच काहीसे झाले आहे 

एका आठवड्यात हा स्क्रीनशॉर्ट पाच हजार 850 पेक्षा अधिक फेसबुक युझर्सने शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT