Ulhasnagar
Ulhasnagar 
मुंबई

'अभय योजने'मुळे बड्या आसामींच्या संपत्तीवर टाच

दिनेश गोगी

उल्हासनगर : थकबाकी वसूलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किंबहूना समीप पोहचण्याकरीता उल्हासनगर पालिकेने पाचव्यांदा अभय योजना लागू केली आहे. मात्र दस्तुरखुद्द बड्या आसामींनीच या योजनेकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा आक्रमक पवित्रा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांसह 20 अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना प्रतिदिन 10 आसामींच्या संपतींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

कर विभागाचे उपायुक्त दादा पाटील, करनिर्धार व संकलक संतोष जाधव आहेत. याव्यतिरिक्त ज्या अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यात, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजया कंठे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. युवराज भदाणे, प्रभारी मुख्यलेखाधिकारी हरेश इदनानी, शहर अभियंता राम जयस्वार, पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, प्रबोधन मवाडे, अलका पवार, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, बालाजी लोंढे, अशोक जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी, शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी निलम कदम-बोडारे, प्रोग्रामर श्रद्धा सपकाळे आदींचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांचे दैनंदिन काम करतानाच मालमत्ता कर वसुलीचे कारवाईचे काम करायचे आहे. त्यात त्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांनाही नियम 1979 अंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशाराच आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

निंबाळकर आयुक्त पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी कर वसुलीवर विशेष लक्ष दिले आहे. कर भरण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अभय योजनाही लागू केली आहे. आतापर्यंत अभय योजनेत 37 कोटींची वसुली झाली आहे. या चालू वर्षात 309 कोटींची वसुली आवश्यक असताना अवघी 74 कोटींची वसुली झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती दयनीय आहे. हे सर्व करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सक्तीची वसुली करण्यासाठी विशेष कर वसुली पथकाचे गठन त्यांनी केले आहे. एक पॅनलला एक अधिकारी याप्रमाणे पथकाची रचना असून प्रत्येक अधिकाऱ्याला त्याचे दिवसाचे कामकाज संभाळून सर्वाधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची उतरत्या क्रमाने भेट घेणे, त्या मालमत्ता ताब्यात घेणे, जप्ती व लिलाव करण्याची प्रक्रिया करून याबाबतची माहिती दैनंदिन अहवाल बनवून पालिका आयुक्तांना सादर करावयाचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT