मुंबई

'केडीएमसी'तील बाजारपेठा तर उघडल्या; मात्र ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प

शर्मिला वाळुंज

ठाणे : मुंबई-ठाणे पाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दुकाने बुधवारपासून दररोज खुली ठेवण्याचे आदेश व्यापाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहात दुकाने खुली केली, परंतु पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रतिसाह काहीसा कमीच दिसून आला. गणेशोत्सवास अवघे दोन दिवस राहिल्याने शेवटच्या दिवसात बाजारात गर्दी होईल असे चित्र होते, परंतु कोरोनाचे सावट अद्यापही कायम असल्याने बाजारपेठांमध्ये ग्राहक बिचकत बिचकतच पाऊल ठेवत असल्याचे दिसून आले.

ठाणे पाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनीही महापालिका हद्दीतील दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली ठेवण्याचे आदेश मंगळवारी जाहीर केले. सण उत्सवांच्या काळात दुकाने दररोज खुली ठेवण्याविषयी व्यापारी वर्गाकडून सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली जात होती. आयुक्तांच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण दिसत असले तरी, ग्राहकांची संख्या रोडावल्याने त्यांचा उत्साह एका दिवसातच मावळल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. कोरोनाचे सावट त्यात पावसाचीही रिपरिप सुरु असल्याने बुधवारी सकाळी बाजारात गर्दी दिसली नाही. 

कल्याणमधील शिवाजी चौक, स्टेशन परिसर, डोंबिवलीतील फडके रोड, स्टेशन परिसर, दिनदयाळ रोड, सुभाष रोड आदी परिसरातील दुकाने गणेशोत्सवानिमित्त सज्ज झाली आहेत. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची येथील दुकानात नेहमीच झुंबड उडते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने खुली झाली असली, तरी ग्राहक बिचकतच दुकानात पाऊल ठेवत होते. एकमेकांपासून सामाजिक अंतर दुकानात राखण्याचा प्रयत्न करताना दिसले.

एकीकडे या दुकानांत ग्राहकांची गर्दी तुरळक दिसत असली तरी, भाजी, मच्छी मार्केट परिसरात मात्र ग्राहकांची गर्दी दररोज होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नाही.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT