मुंबई

तीन सिलिंडर बाहेर काढल्याने महाभयंकर अनर्थ टळला, पण पहिल्या ब्लास्टमध्ये मालक गेला

दिनेश गोगी

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 मध्ये प्रसिद्ध असलेल्या वडापाव आणि भजीच्या दुकानात भीषण सिलिंडर स्फोट झाला. या स्फोटामध्ये दुकान मालक ठार तर एकूण 11 जण गंभीररीत्या  होरपळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उल्हासनगरात घडली. सुदैवाची बाब एवढीच की दुकानातील तीन सिलेंडर सुरक्षित राहिल्याने पुढे होणारा महाभयंकर अनर्थ  टळला आहे.

उल्हासनगर 25 सेक्शन मधील पारसडेअरी जवळ आणि महावीर हॉस्पिटल समोर व्हीनस चौकात 'जय माता दी'  नामक दुकान आहे  हा वडापाव, भजीवाला पप्पू भाजियावाला या नावाने प्रसिद्ध आहे. 

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी खाद्यपदार्थ पार्सल देण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार ग्राहकांना वडापाव, बटाटा भजी, कांदा भजी पार्सल देण्याचे काम सुरू असतानाच दुकानातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात रविंद्र उर्फ पप्पू गुप्ता हा दुकान मालक जागीच ठार झाला. तर आतमध्ये काम करणारे कारागीर आणि  बाहेर उभे असलेले ग्राहक असे 11 जण होरपळले आहेत.

स्फोटाची माहिती समजताच पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी आग आटोक्यात आणून दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळेच पुढे होणारा महाभयंकर अनर्थ टळला. होरपळलेल्या 11 जणांना शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

massive explosion in vadapav shop in ulhasnagar killed owner 11 injured

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT