matrimonial website
matrimonial website sakal media
मुंबई

लसीकरण पूर्ण झालेले स्थळ हवे; 75 टक्के वधु-वरांची अपेक्षा

भाग्यश्री भुवड

मुंबई : सुशिक्षित, समजूतदार आणि लसीकरण (corona vaccination) पूर्ण झालेले स्थळ हवे. तर, 75.5 टक्के विवाह इच्छुक वधु-वरांची (marriage candidates) नवी अपेक्षा असल्याचे एका मॅट्रिमोनीच्या सर्व्हेक्षणातून (Matrimonial survey) समोर आले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातून 121 जणांचा समावेश होता.

सध्याच्या कोव्हीड काळात भावी जोडीदार व्हॅक्सिनेटेड हवा असल्याची वधु-वरांची नवीन अपेक्षा आहे. 'पवित्रविवाह’ या मॅट्रिमोनी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आले. तर 21.5 टक्के जण व्हॅक्सिनेशनबद्दल विचारत नसल्याचे निदर्शनास आले. या मॅट्रिमोनी संस्थेतर्फे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आलेल्या 'पँडेमिक दरम्यान लग्नाची स्थिती' या ऑनलाईन सर्व्हेक्षणातून तरूणाईचे लग्नासंदर्भातील निर्णय, विचारांबद्दल अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले.

महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, अहमदनगर या भागातून 20 ते 7- वयोगटापर्यंतच्या 121 नागरिकांनी सर्व्हेक्षणात सहभाग घेतला.  तर, 63.6 टक्के पुरुष तर 35.5 टक्के महिलांचा या समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेक्षणात सर्वाधिक समावेश मुंबईकरांचा असून 71.1 टक्के मुंबईकरांनी त्यांचे मत मांडेल. कोव्हीड स्थितीमुळे 63.3 टक्के तरूणाईने त्यांचे लग्न लांबणीवर टाकले असल्याची बाब यातून समोर आली. तर, 57.9 टक्के जणांनी इनडोअर तर 27.3 टक्के जणांनी आऊटडोअर लग्न समारंभास प्राधान्य दिले आहे. सध्या व्हर्च्युअल मॅरेजचा ट्रेंड सुरू आहे.

पण भविष्यात व्हर्च्युअल मॅरेजपेक्षा पारंपारिक पद्धतीने लग्न करण्यास पसंती दिली जाणार असल्याचे मत 52.9 टक्के जणांनी मांडले तर कदाचित हा ट्रेंड सुरू राहणार असल्याचे 24.8 टक्के जणांचे म्हणणे आहे.' कोव्हीडच्या निर्बंधामुळे अनेक जण गुगल मीट, सोशल मीडियाद्वारे लग्न समारंभ साजरा करण्यावर भर देत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हा मार्ग सोयीस्कर असला तरी आपली पूर्वापार चालत आलेली लग्नाची संस्कृती पाहता येणार्‍या काळात थाटामाटात लग्न करण्यावर तरूणाई भर देईल, पवित्रविवाह'चे संचालक ऋषिकेश कदम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT