खचलेली नळीची वाट 
मुंबई

रायगड- पुण्याला जाेडणारा हा मार्ग खचला; रहिवाशांसह पर्यटकांची दगदग वाढली

सकाळ वृत्तसेवा

कर्जत  ः मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मावळ तालुक्‍याला कळकराई गावाला कर्जत तालुक्‍याला जोडणारी नळीची वाट खचली आहे. त्यामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा सध्या एक जवळचा दुवा पुन्हा जोडण्याची मागणी होत आहे.  

कळकराई ग्रामस्थांना कर्जत येथे येण्यासाठी नळीच्या वाटेचा उपयोग होत असतो. तसेच जवळची बाजारपेठ म्हणून ग्रामस्थ कर्जत तालुक्‍यातील कशळे बाजारपेठेचा व मुंबईला जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत असतात. कळकराई गाव सह्याद्रीच्या डोंगरात वसल्याने येथे येणारे पर्यटकसुद्धा या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत असतात; मात्र सध्या पावसाचे प्रमाण वाढल्याने या भागातील रस्ते, पायवाटा या निसरड्या झाल्या असून त्या खचल्या असल्याने येथून प्रवास करणे धोकायदायक ठरू शकते. 
खूशखबर : गणपती मूर्ती येणार दारी...

नळीची वाट खचल्याचे फोटो ग्रामस्थांनी सोशल माध्यमांतून व्हायरल केले आहेत. तसेच हा रस्ता बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनदेखील ग्रामस्थांनी केले आहे. 
नळीची वाट ही खूपच निसर्गरम्य आहे. त्याचा उपयोग ट्रेकीसह आणि पर्यटनासाठीही करतो. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी दुरूस्तीची कामे करावीत, अशी मागणी पर्यटक महेंद्र पाटील यांनी केली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT