प्रशासनाला खडबडून जाग; पावसाळ्यापूर्वी होणार अधिकाधिक कोरोना चाचण्या 
मुंबई

Coronavirus : पावसाळ्यापूर्वी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, दररोज सरासरी 2000 बाधित सापडतात. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर अधिकाधिक चाचण्या करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; त्यासाठी राज्यात आणखी 27 प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत.

राज्यात 9 मार्चला कोरोना चाचण्यांसाठी केवळ दोन प्रयोगशाळा होत्या, आज 72 प्रयोगशाळा सुरू आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 18, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत आठ आणि रत्नागिरी येथे एक अशा 27 नव्या प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रयोगशाळा काही दिवसांतच सुरू झाल्यावर राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 100 होईल, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली.

 राज्यात मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला तेव्हा दिवसाला केवळ 600 ते 700 चाचण्या करण्याची क्षमता होती. केवळ मोठ्या शहरांमध्ये या प्रयोगशाळा होत्या. आता टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर शहरे आणि जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू होत असून, दिवसाला 13 हजारांहून अधिक चाचण्या करण्याची क्षमता झाली आहे.

ही बातमी वाचली का? ठाण्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद
 
त्रिस्तरीय उपचारपद्धती
सध्या राज्यात टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन (चाचण्या, शोध आणि विलगीकरण) अशा त्रिस्तरीय उपचारपद्धतीवर भर देण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अगोदर अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचून संसर्ग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या त्रिस्तरीय उपचार पद्धतीला यश येत असून, त्यामुळे राज्यातील स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांमधील सुमारे 80 टक्के व्यक्ती लक्षणविरहीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT