corona testing 
मुंबई

कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर हा आहे एकमेव पर्याय

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाशी मुकाबला करायचा असेल, तर जास्तीत जास्त चाचण्या करणे गरजेचे आहे. विकसीत देशांत मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्याने त्यांच्याकेड रुग्णांची संख्या अधिक दिसत असली तरीही त्यामुळे कोरोनाचे निदान करणे त्यांना सोपे गेले. भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यापैकी 18 टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आश्चर्य म्हणजे एकट्या मुंबई शहरात झालेल्या चाचण्या एवढ्या चाचण्या अन्य कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत.

देशभरात 13 एप्रिलपर्यत कोरोनाच्या 2 लाख 17 हजार 554 चाचण्या झाल्या होत्या. त्यापैकी महाराष्ट्रात 41 हजार म्हणजे 18 टक्के चाचण्या झाल्या होत्या. तर मुंबईत 27 हजार 397 चाचण्या म्हणजे 12 टक्के चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्रा खालोखाल केरळ 15 हजार 683, तामिळनाडू 12 हजार 746 आणि दिल्ली येथे 11 हजार 709 चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाला रोखायचे असल्यास जास्तीत जास्त चाचण्या करणे गरजेचे आहे. मात्र, संपूर्ण देशातच चाचण्यासाठी आवश्यक असलेल्या किट्सची मर्यादा आहे. तरीही जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्ण शोधण्यावर महाराष्ट्र सरकार भर देत आहे.

राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये आजाराबाबत कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. फक्त त्यांची चाचणी झाली म्हणून बाधा झाल्याचे लक्षात आले होते. अशा वेळी विषाणूचे हे सायलंट कॅरियर धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे मुंबई आणि राज्याने जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे सूत्र अवलंबले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT