mumbai local
mumbai local sakal
मुंबई

लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच!

वैष्णवी कारंजकर

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. आज धावणाऱ्या लोकलची संख्याही कमी असेल. त्यामुळे प्रवाशांनी या मेगाब्लॉकबद्दल जाणून घ्यायलाच हवं, अन्यथा खोळंबा अटळ!

मध्य रेल्वे, पश्चिम आणि हार्बर मार्गावर या तीनही मार्गांवर हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदरदरम्यान रात्री जम्बो ब्लॉकची घोषणा कऱण्यात आली आहे.

कसं असेल ब्लॉकचं वेळापत्रक?

मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार या मार्गावरच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबवतील आणि पुढे डाऊन मार्गावर वळवल्या जातील. शिवाय घाटकोपर इथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या जलद मार्गावरुन वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते भाईंदर दरम्यान अप डाऊन जलद मार्गावर वांद्रे ते माहीमदरम्यान रविवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT