Mercedes benz.jpg 
मुंबई

'या' कंपनीची सर्वात आलिशान एसयूव्ही बाजारात 

चंद्रकांत दडस

मुंबई : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या आलिशान कार उत्पादक कंपनीने बुधवारी नवीन जीएलएस ही सर्वात मोठी व सर्वाधिक आलिशान एसयूव्ही सादर केली. या श्रेणीला एसयूव्ही एस-क्‍लास म्हणून ओळखले जाते. नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलएस ही र्सिडीज बेंझची सर्वात मोठी आणि सर्वात आलिशान एसयूव्ही आहे. ग्राहकांना या गाडीमध्ये अधिक जागा, अधिक आराम, अधिक तंत्रज्ञान आणि अधिक आलिशानपणा मिळू शकणार आहे. 

भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या इतर कोणत्याही एसयूव्हीध्ये नसतील अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वैशिष्ट्ये नवीन जीएलएसध्ये आहेत. हे खरोखरीच ऑफ-रोडर वैशिष्ट्ये असलेले आलिशान स्वरुपाचे वाहन आहे. नवीन जीएलएसअंतर्गत रचना व सजावट ही मर्सिडीज-बेंझ लक्‍झरी सलूनसारखी आहे, तसेच एसयूव्हीसारखा दणकटपणा व आरामही यामध्ये जाणवतो. नवीन जीएलएसध्ये तिच्या पूर्वीच्या श्रेणीपेक्षा मोठा व्हीलबेस (3135 मिमी, 60 मिमीने जास्त) दिलेला असून आतील जागाही जास्त (87 मिमी) आहे. विशेषत: दुसऱ्या रांगेतील सीट्‌ससाठी ही जादाची जागा उपलब्ध आहे आणि सीट मागेपुढे करून ती जुळवूनही घेता येते. 

मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या सेंटर ऑफ एक्‍सलंन्समध्ये जीएलएसचे औपचारिक उद्घाटन डिजिटल पद्धतीने केले. ते याप्रसंगी म्हणाले, आलिशानपणा, आराम आणि तंत्रज्ञान यांचा संयोग असलेली मर्सिडीज-बेंझ जीएलएस आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात चांगली आलिशान एसयूव्ही आहे. पूर्ण आकाराच्या, सात-सीटर असलेल्या या नवीन जीएलएस एसयूव्ही मध्ये सर्वच प्रवाशांना ऐसपैस जागा मिळते; विशेषतः दुसऱ्या रांगेत बसणाऱ्यांसाठी अधिक जागा आणि अतिरिक्त लेगरूम आहे. जीएलएस मध्ये अत्याधुनिक स्वरुपाची एमबीयूएक्‍स इंफोटेनमेंट सिस्टीम आहे, त्याशिवाय मर्सिडीज मी कनेक्‍ट सर्व्हिसद्वारे ती पूर्णपणे कनेक्‍टेड आहे. त्यामुळे ती टेक्‌-सॅव्ही एसयूव्ही बनली आहे. जीएलएसचा अंतर्गत भाग आधुनिक, विलासी सौंदर्यशास्त्र आणि एसययूव्हीचा हॉलमार्क यांचा अनोखा संगम आहे. आमच्या मते, नवीन जीएलएस ही ऑफ-रोडरच्या वैशिष्ट्यांसह आधुनिक लक्‍झरीचे एक आदर्श मिश्रण आहे. 


स्पेसिफिकेशन्स 
जीएलएस 400 डी 4मॅटिक 
जीएलई 450 4मॅटिक (इक्‍यू बूस्ट) 
सिलिंडर्स / व्यवस्था 
ओएम 656 बीएस-6 इनलाइन / 6 सिलिंडर 
एम 256 बीएस-6 इनलाइन / 6 सिलिंडर 
डिस्प्लेसमेंट (सीसी) 
2,925 
2,999 

सुरक्षा 
360 अंशांत फिरणाऱ्या दृश्‍य कॅमेऱ्यासह पार्किंगचे साहाय्य 
चालक सहाय्यक प्रणाली: ब्लाइंड स्पॉट-असिस्ट आणि ऍक्‍टिव ब्रेक असिस्ट 
नऊ एअरबॅग्ज 
डाउनहिल स्पीड रेग्युलेशन (डीएसआर) 
ऑफ-रोड एबीएस 
कार वॉश फंक्‍शन 

अंतर्गत रचना व सुविधा 
64 रंगांच्या अँबियन्ट लाइटिंगसह एक्‍स्प्रेशन इंटर्नल पॅकेज 
हाय-ग्लॉस अँथ्रासाइट लाईम वूड ट्रिम 
नेपा लेदरने सजवलेले सर्व नवीन सुविधांसह स्पोर्टस स्टिअरिंग व्हील 
सीट कायनेटिक्‍ससह मेमरी पॅकेज फ्रंट 
थर्मोट्रॉनिक 5-झोन स्वयंचलित हवामान नियंत्रण 
एक्‍स्टेंडेड सेंटर कन्सोल आणि लक्‍झरी हेड रिस्ट्रेंट यांसह रीअर कम्फर्ट पॅकेज प्लस 
मागील दारांवर इलेक्‍ट्रिक सन ब्लाइंड्‌स 
पुढील प्रवासी सीटचे नियंत्रण मागील बाजूने करण्याची सुविधा 
दुसऱ्या रांगेतील सीट्‌स मागे-पुढे करण्यासाठी इलेक्‍ट्रिकल नियंत्रण 
दुसऱ्या व तिसऱ्या रांगांतील सीट्‌सची बॅकरेस्ट दुमडण्यासाठी इलेक्‍ट्रिकल वन-टच नियंत्रण 
तिसऱ्या रांगेतील सीटकडे जाण्यासाठी सुलभ प्रवेश 
अवजड सामान उतरविण्यासाठी एअरमॅटिक लेव्हल कंट्रोल 
इझी-पॅक टेलगेट आणि लगेज कव्हर 

टेलीमॅटिक्‍स आणि इन्फोटेनमेंट: 
बर्मेस्टरऍ सराउंड साउंड सिस्टीम 
एचडीडी नॅव्हिगेशन (3 डी) यांसह एमबीयूएक्‍स मल्टीमीडिया सिस्टीम (एनटीजी 6) 
एमबीयूएक्‍स इंटिरिअर असिस्टंट कॉन्टॅक्‍टलेस गेस्चर कंट्रोल 
मागील सीट्‌ससाठी करमणूक प्रणालीचे प्री-इन्स्टॉलेशन 
वायरलेस चार्जिंग (समोरील आणि मागील) 
एमबीयूएक्‍स रीअर टॅब्लेट (मागे घेण्यायोग्य) 
मागील बाजूस अतिरिक्त यूएसबी पोर्ट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT