Ashwini Bhide Sakal
मुंबई

मेट्रो ३च्या कारशेडसाठी अतिरिक्त झाडे तोडावी लागणार नाहीत - आश्विनी भिडे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आरेतील मेट्रो ३च्या कारशेडसाठी आता अतिरिक्त झाडे तोडावी लागणार नाहीत असं मत मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान, या कामाची किंमत वेगवेगळ्या कारणांमुळे वाढली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

(Aarey CarShed Updates)

मेट्रो ३च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार असून या कामात असलेल्या अडथळ्यांमुळे आणि विलंबामुळे या कामाच्या निधीत तब्बल १० हजार २७० कोटींना वाढ झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. कारशेडच्या प्रकल्पाचं काम ७५ टक्के झालं असून २३ हजार १३६ पैकी २१ हजार ८९० कोटी एवढा निधी मिळाला आहे. त्यामधील २१ हजार ५२० कोटी निधी खर्च केला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता होती ती पुर्तता कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये एकूण ३० हेक्टर जागा दिली आहे. त्यापैकी २५ हेक्टर जागेमध्येच काम करण्यात येणार असून ५ हेक्टर जागेमधील झाडे न तोडण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यामुळे आता अतिरिक्त झाडे ताडली जाणार नसल्याचं आश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT