मुंबई

मेट्रो स्थानक भाड्याने देणे आहे.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मेट्रो 3 मार्गावरील सिद्धीविनायक मंदीर या प्रस्तावित स्टेशनचा परिसर वाणिज्यिक वापरासाठी देऊन त्यातून महसूल मिळविण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केला आहे. या मार्गावरून सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ होणार असल्याने येथे एक अतिरीक्त मजला बांधून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

सिद्धीविनायक मंदिर तीन मजली बांधण्यात येणार असून तळमजला आणि मुख्य मजल्याच्यामध्ये एक मजला तयार केला जाईल. ही जागा वाणिज्यिक वापरासाठी देण्यात येणार आहे. रिटेल दुकानदार, ऑफिस, बॅंक, शैक्षणिक संस्था, रेस्टॉरंट अशा स्वरुपाच्या वाणिज्यिक वापरातून महसूल उत्पन्नवाढ केली जाणार आहे. मेट्रो 3 हा मार्ग एमएमआरसीएल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून चालवायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने स्टेशन परिसरात दुकाने किंवा वाणिज्यिक वापर करण्याचा एमएमआरसीएलचा विचार आहे.एमएमआरसीएलने सिद्धीविनायक मंदिर स्टेशन परिसराचा वाणिज्यिक वापराच्या प्रस्ताव तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच हा प्रस्ताव एमएमआरसीएलच्या बैठकीत सादर केला जाणार असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तो सरकारकडे मंजुरीला पाठविला जाणार आहे. 

सिध्दीविनायक स्थानकच का ?

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरापासून काही अंतरावर मेट्रो 3 चे हे स्टेशन होणार आहे. या मंदिरात दर दिवशी सुमारे 20 हजार भाविक येतात. मंगळवारी आणि संकष्टीच्या दिवशी ही संख्या 50 हजाराच्या वर पोहचते. त्यामुळे या मंदिरात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणारे बहुतेक भक्तगण मेट्रो 3 चा मार्ग अवलंबतील असा अंदाज आहे.त्यामुळे सिद्धीविनायक मंदीर स्टेशन परिसराचा वाणिज्यिक वापर करून त्यातून उत्पन्न मिळविण्यात येणार आहे. 

सिध्दीविनायक ट्रस्टचा होता प्रस्ताव 

सिध्दीविनायम मंदिर ट्रस्टकडून गरजू रुग्णांना मदत दिली जाते.यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गरजू नागरीक मंदिरात येत असतात.हे मदतकक्ष मंदिराच्या परीसरात असल्याने गर्दीमुळे नागरीकांना योग्य माहिती देता येत नाही तसेच कक्षा पर्यंत पोहचण्यात नागरीकांनाही अडचणी येतात.त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या परीसरात या कक्षासाठी जागा मिळावी असा प्रस्ताव सिध्दीविनायक ट्रस्टने दिला होता.या ट्रस्टच्या मागणी बाबत विचार करताना सिध्दीविनायक स्थानकाचा वाणिज्य वापर करण्याचा विचार पुढे आला. 

Webtitle : metro station to be given on rent decision of metro rail corporation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT