file photo 
मुंबई

तुमची कार व्हायरसला संपवणार! 

चंद्रकांत दडस

मंबई : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत दीड लाख जणांचा यात बळी गेला आहे. तर लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. कोणत्याही पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू राहात असल्याने अनेक जण कारमध्ये बसण्यास घाबरत आहेत. मात्र आता एमजी मोटर इंडिया एका तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या कारमधील केबिनची हवा आणि पृष्ठभाग नैसर्गिकरित्या स्वच्छ करून व्हायरसला संपवणार आहे. त्यामुळे कारमधील विविध पृष्ठभागही जंतूविरहीत झाल्यामुळे तुम्हाला अगदी आरामात कारमधून प्रवास करता येउ शकेल. 

एमजी मोटर इंडियाने आपल्या कारच्या केबिनचा पृष्ठभाग नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी सिंगापूरमधील मेडक्‍लिन कंपनीशी हातमिळवणी केली आहे. हेक्‍टर आणि झेडएस ईव्ही या भारतीय उत्पादनांमध्ये मेडक्‍लिनची पेटंट केबिन स्टरलायझेशन टेक्‍नोलॉजी सेराफ्यूजन इन्स्टॉल करण्यासंबंधी व्यवहार्यतेचे मूल्यांकन आता एमजी मोटर इंडिया करणार आहे.. 
युनिक आणि गेमचेंजिंग इनोव्हेशन असल्याने सेराफ्यूजन टेक्‍नोलॉजी प्रवाशांचे आरोग्य आणि वेलनेसची हमी देत कारचे केबिन पूर्णपणे जंतूविरहित आणि स्टरलाइज करते. कोणत्याही रसायनाविना सक्रियतेने ऍलर्झन्स, प्रदुषके आणि सूक्ष्मजीवांना निष्प्रभ करण्यासाठी सक्रिय ऑक्‍सिजनचा वापर या तंत्रज्ञानात केला जातो. हे सोल्युशन केबिनमधील हवेतील बॅक्‍टेरिया, मोल्ड, यीस्ट आणि व्हायरस नष्ट करते तसेच कारमधील विविध पृष्ठभागही जंतूविरहीत करते. 

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्‍टर राजीव चाबा म्हणाले, नावीन्य आणि सुरक्षेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळेच या क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक कंपनी मेडक्‍लिनशी आम्ही भागीदारी करत आहोत. जेणेकरून आमच्या वाहनांमध्ये जागतिक स्तरावरील केबिन स्टरलायझेशन सोल्युशन इन्स्टॉल करण्याची शक्‍यता आहे. आम्ही सक्रियतेने एचव्हीएसी सिस्टिम बेस्ड केबिन स्टरलायझेशन आणि डिशइंफेक्‍शन टेक्‍नोलॉजी तैनात करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना स्वच्छा आणि सुरक्षित कारसोबत सुरक्षित परिवहनाचा अनुभव आणि सेवा विकसित करण्याच्या दिशेने काम सुरूच ठेवूत. फ्यूचर फॉरवर्ड ब्रॅंडच्या रुपात ही नवी सुरुवात कोरोनाच्या साथीनंतर जगातील न्यू नॉर्मल प्रति आमची तत्परताही दर्शवते.' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT