file photo 
मुंबई

एमजी मोटर इंडियाकडून 'हेक्‍टर प्लस'चे उत्पादन सुरू 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एमजी मोटर इंडियाने बहुप्रतीक्षित अशा हेक्‍टर प्लसचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. हलोल येथील अत्याधुनिक प्रकल्पात तयार झालेली हेक्‍टर प्लस ही ऑटोएक्‍सपो मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. जुलै 2020 मध्ये ती विक्रीस उपलब्ध असेल. 


हेक्‍टर प्लस ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ती भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. कारच्या मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वोत्कृष्ट आरामाचा अनुभव मिळेल. कौटुंबिक गरजांसाठी तिस-या रोचाही समावेश करण्यात आला आहे. ही हाय अपिल एसयूव्ही नव्या प्रीमियम लुकमध्ये असेल. यात हेडलॅंप्स, फ्रंट ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्‌स असतील. 
एमजी मोटर इंडियाचे प्रमुख प्रकल्प अधिकारी मनीष मनेक म्हणाले, हेक्‍टर प्लस ही विशेषत्वाने कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली असून यात मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट असून तिसऱ्या रोमध्ये किशोरवयीन मुलांसाठी जागा आहे. हेक्‍टर ब्रॅंडच्या फॅमिलीत समाविष्ट झालेली हेक्‍टर प्लस ही आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आणि अतुलनीय आरामदायी असल्याने ती स्मार्ट चॉइस असेल." 

कठोर चाचणी 
सध्याच्या नियमांसह उत्पादनासंबंधी नियमांचे पालन करून एमजीचा हलोल येथील प्रकल्प जागतिक स्तरावरील उत्पादन मानदंडांनुसार काम करीत आहे. वाहनांची विविध प्रकारे कठोर चाचणी घेतण्यात आहे. विशेषत: भारतासाठी उत्पादने तयार करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कारनिर्माता कंपनीने प्रकल्पात कॅप्टिव्ह व्हेंडर पार्कदेखील उभारले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या गुजरातमधील प्रकल्पात आधुनिक रोबोटिक स्पॉट वेल्डिंग, रोबोटिक रोलर हेमिंग आणि रोबोटिक ब्रेझिंग फॅसिलिटीज असून याद्वारे सर्वोत्कृष्ट वेल्डिंग आणि डायमेंशनल कंसिस्टन्सी मिळते. यातील पेंट शॉपमध्ये उत्तम पेंट फिनिश मिळवण्यासाठी तसेच रंगसंगती साधण्यासाठी कोटिंगचे सर्व टप्पे रोबोटिक ऍप्लीकेशनद्वारे पार केले जातात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT