Mhada sakal media
मुंबई

म्हाडा भूखंडांवर अनधिकृत बांधकामे सुरूच

79 बांधकामे सुरु असल्याचे निर्दशनास

तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडाच्या (Mhada) भूखंडांवर सुरू असलेली अतिक्रमणे हटविण्याची जोरदार मोहीम म्हाडाच्या मुंबई मंडळाने (Mumbai region) सुरू केली आहे. मात्र यानंतरही म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वसाहतींमधील भूखंडांवर अनधिकृत बांधकामे (illegal work) सुरूच असल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांच्या (mhada authorities) पाहणीमध्ये आढळून आले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबई मंडळांर्गत 79 ठिकाणी बांधकामे सुरु असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली आहे.

राज्य सरकारने म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. यापूर्वी म्हाडाकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पथक अस्तित्वात होते. मात्र हा विभाग बंद झाल्याने म्हाडा वसाहतीमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई बंद झाली होती. यानंतर म्हाडा वसाहतीमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत म्हाडा कार्यालयात नागरिक तक्रारी करतात. मात्र म्हाडाकडे यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने अनधिकृत बांधकामांना अभय मिळत गेले.

अनधिकृत बांधकामांबाबत प्राप्त तक्रारी निकालात काढण्यासाठी म्हाडाने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्राप्त होताच स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार म्हाडाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक यंत्र, मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून बांधकाम सुरू असलेल्या कामांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वसाहती, भूखंडांची पाहणी करून अनधिकृत बांधकामे सुरु आल्याची माहिती घेतली. त्यामध्ये म्हाडा वसाहती आणि म्हाडाच्या भूखंडांवर सुमारे 79 बांधकामे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर 118 बांधकामे जुनी असल्याचे निदर्शनास आले आहे. या बांधकामांवर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच कारवाई केली जाईल, असे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: शेवटी ते बापाचं काळीज! भारतातून कॅनडाला गेलेल्या वडिलांनी लेकं अन् नातीला दिलं भावनिक सरप्राइज

Mumbai : आमदार निवासातील कँटिन चालकाला दणका, अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई

Pune News : खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

Guru Purnima 2025: ज्यांनी केवळ अभिनयच नाही, आयुष्यही शिकवलं; कलाकारांच्या गुरूविषयी आठवणी

Satara News : कराड हादरलं! अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; जन्मदात्यांचीच 'तिला' जीवे मारण्याची धमकी..

SCROLL FOR NEXT