Mumbai BDD Chawl

 

ESakal

मुंबई

Mumbai News: म्हाडाला होणार फायदा! बीडीडी चाळ भूखंडातून मिळणार ८०० कोटी

Mumbai BDD Chawl: बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत म्हाडाकडून पुनर्विकास केला जात आहे. येथे उभारल्या जाणाऱ्या इमारतींशिवाय शिल्लक जागांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. त्यामुळे म्हाडाला फायदा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत म्हाडाकडून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार येथील मूळ रहिवाशांना घरे देण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या इमारतींशिवाय शिल्लक जागांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. त्यानुसार म्हाडाकडून नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील सुमारे ३,९०० चौरस मीटरचे भूखंड लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने दिले जाणार आहेत. त्यातून म्हाडाला किमान ८०९ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

म्हाडाकडून बीडीडीवासीयांना गगनचुंबी इमारतीत ५०० चौरस फुटांची सुसज्ज घरे दिली जात आहेत. त्यानुसार इमारती उभारून शिल्लक राहणाऱ्या भूखंडावर व्यावसायिक इमारती उभारण्याचे नियोजन आहे. दरम्यान, म्हाडाने नायगाव येथील १,७०० चौरस मीटर, तर ना. म. जोशी मार्ग येथील २,२०० मीटरचा भूखंड चटई क्षेत्रफळासह ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती.

नायगावसाठी ३७१ कोटी, तर ना. म. जोशी मार्ग येथील भूखंडाचा ४३८ कोटींचा किमान भाडेपट्टा निश्चित केला आहे. सध्या तीन कंपन्यांनी हे भूखंड भाडेपट्ट्याने घेण्यासाठी म्हाडाकडे नोंदणी केली आहे. त्यानुसार भूखंड भाडेपट्ट्यातून म्हाडाला ८०९ कोटींची रक्कम मिळणार आहे.

निविदा मंगळवारपर्यंत भरता येणार

बीडीडी चाळींच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जाणाऱ्या भूखंडासाठी इच्छुकांना मंगळवारपर्यंत (ता. १६) निविदा सादर करता येणार आहेत. त्यामुळे कमाल किती कोटींची लिलाव किंमत भरली जाणार, याकडे रिअल इस्टेट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT