मुंबई

स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः गेले काही आठवडे स्थलांतरीत मजूर मुंबईतून गावी परत जाण्यासाठी किती कष्ट करीत आहेत, हे नजरेस येत होते, पण आता त्यातील काहींनी आपल्या मालकांना नोकरीवर परत येण्याबाबत फोन करण्यास सुरुवात केली आहे, एवढेच नव्हे तर काहींनी मुंबईत परतण्याची व्यवस्था करण्यासाठी साकडे घातले आहे.

संजय साहू हा सोन्याच्या पिढीवर काम करणारा दोन आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालला गेला होता. आपल्या गावाकडच्या घराची चिंता वाटत असल्याचे त्याने सांगितले होते, असे भाईंदरमधील सोने विक्रेत्यांनी सांगितले. लक्ष्मीधर साहू याने हा आपल्या मालकांकडून दहा हजार रुपये घेऊन पश्चिम बंगालमधील घरी परतला. आता त्याचे पैसे संपले आहेत. त्याने आपल्या मालकाकडून दोन हजार रुपये मागितले आहेत. त्यानेही परतण्याची तयारी केली आहे. 
केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर उत्तर प्रदेशात गेलेले स्थलांतरीतही परतण्यास उत्सुक आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गावाला गेलो, पण पोट्यापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. असे मुंबईत बांधकाम कामगार असलेल्या उमेश पांडेने सांगितले. त्याने आपल्या मालकांना हजार रुपये आगाऊ देण्यास सांगितले आहे. मला कामावर यायचे आहे. माझ्याकडचे पैसे पूर्ण संपले आहेत, असे त्याने सांगितले.

अनेक दुकानदारांनी आपल्या कामगारांशी संपर्क साधल्याचे समजते. त्यांनी परत यावे यासाठी परतीच्या प्रवासाचे पैसेही देण्याची तयारी दाखवली आहे. काहींनी तर आगाऊ मानधनही देण्याची तयारी दाखवली आहे. नव्याने येणाऱ्या कामगारांना काम शिकवण्याऐवजी जुनेच परतलेले चांगले अशीच त्यांची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT