maharashtra police 
मुंबई

पोलिस कोरोनाबाधित झाल्याने अपुऱ्या मुनष्यबळाअभावी परप्रांतीय मजूर राज्यात अडकले

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सहार पोलिस ठाण्यातील 32 पोलिस कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने तेथे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे सुमारे 1870 स्थलांतरित मजुरांनी गावी जाण्यासाठी केलेले अर्ज कार्यवाही विना पडून असल्याची तक्रार आमदार पराग अळवणी यांनी केली आहे.

दिनांक 3 मे पासून स्थलांतरित मजूरानी शासनाने आखलेल्या पद्धतीनुसार सहार पोलिस ठाण्याकडे अर्ज सादर करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत सुमारे 2000 अर्ज सादर झाले आहेत. मात्र यापैकी जेमतेम 130 अर्ज उपायुक्त, परिमंडळ VIII कडे वर्ग झाले असून इतर सर्व अर्ज अद्याप सहार पोलिस ठाण्यातच पडून आहेत अशी माहिती आमदार पराग अळवणी यांनी दिली. 

सहार पोलिस ठाण्यातील या परिस्थितीबाबत आपण 13 में रोजीच्या पत्राद्वारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देऊन अधिक मनुष्यबळ पाठवण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र तसे न झाल्याने सदर कामे प्रलंबित असून यामुळे मजूरांवर अन्याय होत आहे तसेच शासनाच्या धोरणास विसंगत आहे असेही पत्रात नमूद केले आहे. विलेपार्ले पोलिसस्थानकातील पोलिस कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. 

migrant workers were stranded in the state due to insufficient manpower due to police corona positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT