mira bhayandar municiple corporation 
मुंबई

मिरा- भाईंदर महापालिकेची व्यवस्था राम भरोसे; आयुक्तही १४ दिवसाच्या अलगीकरणात.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मिरा-भाईंदरमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात आता करोनाने महानगरपालिकेत देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.आतापर्यंत मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील १२ पेक्षा अधिक अधिकाऱी आणि कर्मचा-यांना करोनाची लागण झाली आहे.  पालिकेचे आयुक्त हेही १४ दिवसाच्या अलगीकरणात गेल्याने पालिकेची व्यवस्था राम भरोसे झाल्याचे बोलले जात आहे. 

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना  करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी आपली करोना चाचणी केली होती.  त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले.  यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांना देखील विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. 

याचा फटका खुद्द आयुक्त डॉ विजय राठोड यांना देखील बसला आहे. या पार्श्वभूमीवर आय़ुक्त १४ दिवसांसाठी घरातच विलगीकरणात राहणार आहेत. त्यांची देखील करोनाची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

मिरा-भाईंदर मधील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याकरिता आयुक्त चंद्रकांत डांगे यांची तडकाफडकी बदली करून, डॉ विजय राठोड यांची नेमणूक करण्यात आली होती.अवघ्या दोन आठवड्यापूर्वीच डॉ विजय राठोड यांनी पदभार स्विकारला  होता आयुक्तांच्या  बदली नंतर येथील परिस्थिती बदलण्या ऐवजी येथील परिस्थिती अधिकच  चिंता जनक झाली आहे.

mira-bhayandar commissioner is quarantine 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Pune Ward Structure : महापालिकेकडे आत्तापर्यंत प्रभाग रचनेवर १६१ हरकती

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

SCROLL FOR NEXT