मुंबई

मीरारोड दुहेरी हत्याकांडातील आरोपी गजाआड; हत्येचं कारण ऐकून बसेल धक्का

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनच्या काळात मुंबईतल्या मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी 12 तासातच गजाआड केलं आहे. बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करुन फरार झालेला आरोपी वेटर कल्लू यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. 35 वर्षीय आरोपीला पुण्यातून गजाआड केलं आहे. आरोपी शबरी बार आणि रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. हत्या केलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे मृतदेह बारच्या पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळले. 

अटक केलेला आरोपी कल्लू यादव मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. हॉटेलचा मॅनेजर साधे जेवण देत असल्याच्या रागातून आरोपीनं मॅनेजरसह अन्य एकाची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याने मॅनेजर आणि दुसर्‍या वेटरवर फावडानं हल्ला केला आणि त्या दोघांची हत्या केली. 

मृतांमध्ये बार मॅनेजर हरीश शेट्टी (वय 42) आणि वेटर नरेश पंडित (वय 58) यांचा समावेश आहे. मालाड येथील गंगाधर पय्याडे यांचे मिरारोड पूर्वेकडे शबरी बार-रेस्टॉरंट असून लॉकडाऊनमुळे सध्या ते बंद आहे. काही कामगार गावी निघून गेल्याने सध्या हॉटेलमध्ये मॅनेजर हरीश शेट्टी याच्यासह नरेश पंडित आणि कल्लू यादव हे तिघेच होते. 

ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड म्हणाले की, ही घटना उघडकीस आल्यानंतर यादवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके स्थापण्यात आली होती. आरोपी कल्लू पुण्यात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ पुण्यात धडकून त्याला अटक केली.

कल्लू यादववर याआधीही गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध कोलकाता येथे हत्येचा, तसेच पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात मारामारी आणि दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोलकातामध्ये त्यानं दोन वॉचमनची हत्या केली होती.

मॅनेजर शेट्टी हा स्वतःसाठी हॉटेलमधून चांगले जेवण मागवायचा. बाहेरुन ऑर्डर केलेले जेवण स्वतः आणि पंडीतला द्यायचा. कल्लूला साधे ज‌ेवण देत असल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली होती. 30 मे रोजी शेट्टी आणि पंडीत यांनी बारमध्येच मदयपान केलं होते. त्यानंतर ते झोपले होते. त्यावेळी या दोघांवर झोपेत असताना फावड्याने हल्ला करत त्यांची हत्या केली, नंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून त्यांचे मोबाइल घेऊन पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान  शेट्टी आणि पंडित यांनी कल्लू याला मारहाणही केली होती, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT