एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव!  
मुंबई

एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव!

सुनिता महामुनकर

मुंबई  : आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका गुणवान विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना चुकून केलेली एक क्‍लिक चांगलीच महागात पडली आहे. यामुळे त्याचा प्रवेश अर्ज बाद झाला असून, त्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रवेशासाठी याचिका दाखल केली आहे.

मूळचा दिल्लीकर असलेला याचिकादार विद्यार्थी सिध्दार्थ बात्राला जेईई एडव्हान्सड परीक्षेत 270 वे गुणांकन मिळाले आहे. प्रवेश अर्ज दाखल करत असताना चुकीने त्याने एका लिंकवर क्‍लिक केले. ज्यामुळे तो पूर्ण प्रक्रियेतूनच बाहेर पडला. आकस्मिकपणे झालेल्या या चुकीमुळे त्याने पुन्हा प्रयत्न केले. मात्र अयशस्वी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने याबाबत आयआयटी व्यवस्थापनाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र व्यवस्थापनाने नकार दिला असून नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे सांगितले. त्यामुळे त्याची याचिका खंडपीठाने नामंजूर केली आहे. याविरोधात त्याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मेहनतीने गाठला होता टप्पा 
दिल्लीत आजी आजोबांबरोबर राहणाऱ्या सिध्दार्थचे आई-वडिलांचे निधन झाले आहे. खूप कष्ट आणि मेहनत करुन परिक्षा पास झालो आहे, अशी विनवणी त्याने केली आहे. अर्ज भरत असताना अचानक आलेल्या एका लिंकवर त्याने चुकुन क्‍लिक केले. स्वतःहून या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर येत आहे, असे सांगणारी ही लिंक होती. यानंतर विद्यार्थ्यांना फी परतावा मिळतो पण प्रक्रियेतून बाहेर जावे लागते. 

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT