मुंबई

हिम्मत तर पाहा या भामट्यांची, थेट महाराष्ट्र सायबर सेलच्याच नावाने सुरु केलं...

अनिश पाटील

मुंबई - राज्यातील सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र सायबर सेलच्या नावाने बनावट ट्वीटर अकाउंट चालवते जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. महाराष्ट्र सायबर सेलमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक रुपाली बोबडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

राज्यातील सर्व सायबर पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय येण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलची स्थापना करण्यात आली होती. ही यंत्रणा सध्या राज्यातील नोडल संस्था म्हणून काम पाहते. सायबर सेलच्या माध्यमातून राज्यात सायबर गुन्ह्यांबद्दल जागृती निर्माण करण्यात येते. त्यासाठी सप्टेंबर 2017 पासून महाराष्ट्र सायबर सेलने अधिकृत ट्वीटर अकाउंट सुरू करण्यात आले होते. त्यावेळी सोशल मीडीयाच्या तपासणीवेळी सायबर सेलचा लोगो, नाव वापरून बनावट ट्वीटर खाते सुरू असल्याचे सायबर सेलच्या अधिका-यांच्या निदर्शनास आले. त्याची तपासणी केली असता ते तोतया असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार नुकतीच कफ परेड पोलिसांनी भादवि कलम 419 (तोतयागिरी करणे) तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66 (क) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलचे कार्यालय दक्षिण मुंबईतील जागतिक बाजार केंद्र येथील इमारतीत असल्यामुळे स्थानिक कफ परेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यातआला आहे. तोतया खात्याचा युआरएल क्रमांक प्राप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

कोरोना संकटामध्ये अफवा व खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवली जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने समाज माध्यमांची तपासणी सुरू होती. त्यावेळी हे बनावट खाते संबंधीत अधिका-यांच्या निदर्शनास आले. 6 जुलैला हे बनावट खाते सापडल्यानंतर तात्काळ वरिष्ठाच्या कानावर हा प्रकार घालून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

misuse of technology complaint lodged for creating fake maharashtra cyber cell account

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT