mithi river sakal
मुंबई

मिठीच्या पुरावर २०२२ला उतारा

सांडव्याचे पाणी वळवणार; अभ्यासानंतर कामाला सुरुवात

- समीर सुर्वे

मुंबई : विहार (Vihar), तुळशी (tulshi) धरण (dam) भरल्यानंतर त्यांच्या सांडव्याचे पाणी मिठी नदीमध्ये (mithi River) नैसर्गिकरीत्या वाहून येते. त्यामुळे मिठी नदीचा धोका अधिक वाढतो. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून महापालिकेने (BMC) हे सांडव्याचे पाणी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राथमिक अभ्यास २०२२ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. (Mithi flood Brihanmumbai Municipal Corporation Start Work)

सांडव्याचे पाणी वळवणार; अभ्यासानंतर कामाला सुरुवात

विहार-तुळशी धरण भरल्यानंतर सांडव्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते. हा नैसर्गिक प्रवाह, त्यात जोरदार पावसाचे पाणी, नदीत येणारे सांडपाणी, यामुळे नदीची पातळी वाढलेली असतेच. त्याचबरोबर समुद्राला भरती असल्याने खाडीतील पाणी थेट कुर्ल्याच्या पुढेपर्यंत नदी पात्रात येते. त्यामुळे शीव, कुर्ला, कलिना, सांताक्रूझ या भागाला दरवर्षी फटका बसतो. महापालिकेने २०२० च्या नोव्हेंबरपासून यासाठी सल्लागार नेमला आहे. पर्जन्यमानाचा अभ्यास करावा लागणार आहे, त्यामुळे दोन वर्ष अभ्यासासाठी लागतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

पुरावर उपाय म्हणून मिठी नदीत येणारे तलावातील सांडव्याचे पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. हा सल्लागार पुढील वर्षापर्यंत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करेल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात मिठी नदीने दोन वेळा धोक्‍याची पातळी ओलांडली होती. पहिल्या वेळेस तर समुद्राला भरती नसताना मिठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुर्ला क्रांतीनगरमधील २०० हून अधिक जणांना स्थालांतरित करण्यात आले होते.

...असा अभ्यास सुरू

  • मुंबईतील एकूण पर्जन्यमान.

  • सांडव्यातील किती पाणी वळवावे लागणार.

  • वातावरणातील बदलाचा मुंबईच्या पर्जन्यावर झालेला परिणाम

तीन पर्यायांचा विचार

  • पाणी जलबोगद्यातून ऐरोली खाडीत सोडणे.

  • जलबोगद्यातून सांडव्याचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पात आणणे

  • प्रकल्पात आणलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पिण्यासाठी वापर

  •  होल्डिंग पॉड बांधून एकाच वेळी नदीत जाणारे पाणी अडवणे.

...म्हणून धोका अधिक वाढतो

तुळशी धरण भरल्यावर सांडव्याचे पाणी विहार तलावात येते. विहार तलाव भरल्यावर सांडव्याचे पाणी नैसर्गिकरित्या मिठी नदीत मिसळते. ही दोन्ही तलाव जुलै महिन्याच्या १५ ते २० दिवसात भरतात. त्यामुळे यानंतरच्या काळात मिठी नदीचा धोका अधिक वाढतो. पावसाच्या मोसमात किमान सात दिवस धरणाच्या सांडव्यातून किमान सात हजार दक्षलक्ष लिटर पाणी प्रत्येक दिवशी वाहून जाते, असा अंदाज आहे. मात्र, संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT