मुंबई

मिठी नदी रोजगार मिळवून देणार - आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मिठी नदीच्या रुंदीकरणाबरोबरच स्वच्छतेचे कामे पुढील दोन वर्षात पुर्ण होईल. पुराचा धोका टाळण्यासाठी नदीवर पुरनियंत्रक गेट बसवण्यात येणार आहे. भविष्यात या नदीतून सफरही करता येईल,त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा दावा युवासेना अध्यक्षआदित्य ठाकरे यांनी केला. शनिवारी कुलाबा येथील पत्रकार परीषदेत ते बोलत होते. 

मिठी नदीसाठी आता पर्यंत 1 हजार 156 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून पुढील कामांसाठी 980 कोटी रुपये खर्च होणार आहे. मिठी नदी बरोबरच दहिसर पोयसर तसेच इतर नद्यांचंही पुनर्जीवन करण्यात येणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक तसेच इतर सुविधा करण्यात येतील. त्याच बरोबर नदीतून जलवाहतूकही करण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नदीपात्राजवळल कित्येक झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या आहेत. तसेच नदीपात्रातील दोन्ही बाजूंना भिंती तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे कामही हाती घेण्यात आल्याची माहिती,यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडायचे की इतर कामांसाठी वापरायचे याबाबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. 

आता पर्यंत झालेली कामे 
7 फुटांपर्यंत 16.2 किमी खोलीकरणाचे काम पूर्ण - 330 कोटी 
16.2 किलोमीटर लांबीचे रुंदीकरणाचे काम पूर्ण - 173 कोटी 
24 किमी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण - 569 कोटी 
गेल्या 5 वर्षांत नदीपात्रातून हटवलेल्या झोपड्या - 4 हजार 388 
पूर्ण झालेल्या कामांचा खर्च - 1156. 75 कोटी रुपये 

सध्या सुरु असलेली कामे 
उर्वरित झोपडपट्ट्या ज्यांच्या हटवण्याचे काम सुरू - 1750 कोटी 
साडेसहा किमीचे रस्ते - 30 कोटी 
साडेतीन किमीची मलजल वाहिनी - 30 कोटी 
11.12 किमी मलजल वाहिनीची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर - 97.5 कोटी अपेक्षित खर्च 
प्रस्तावित कामांचा अपेक्षित खर्च - 980.14 कोटी 
एकूण खर्च - 2136.89 कोटी रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT