raj.jpeg 
मुंबई

'20000 रुपये द्या, मग लॉकडाउन लावा', मनसेचा प्रखर विरोध

दीनानाथ परब

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली, तर वैद्यकीय यंत्रणा तो ताण सहन करु शकणार नाही. वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडेल, असे कारण लॉकडाउन लावण्यासाठी दिले जात आहे.  मुख्यमंत्री लॉकडाउनसाठी अनुकूल असले, तरी विरोधी पक्षात असलेल्या भाजपा, मनसेने लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राज्य भाजपाने लॉकडाउनला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. लॉकडाउन या टप्प्यावर पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाउनचा विरोध करणार असे राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा लॉकडाउनसाठी अनुकूल नाहीय. 

"लॉकडाउन हा उपाय नसल्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. त्याऐवजी आपण आणखी आरोग्य सुविधा निर्माण केल्या पाहिजेत" अशी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. पण "सध्या ज्या पद्धतीने रुग्ण संख्या वाढतेय, त्यामुळे भविष्यात बेडची कमतरता निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत."

"लॉकडाउनचा निर्णय अजून झालेला नाही. वेळ अजून हातातून गेलेली नाही. जनतेने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपालन करावे, तर लॉकडाउन टाळता येईल" असे नवाब मलिक म्हणाले. 

मनसेने सुद्धा लॉकडाउनला कडाडून विरोध करण्याचे संकेत दिले आहेत. कारण लॉकडाउनमुळे रुग्ण संख्या कमी होणार असली, तरी लोकांच्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होईल. बेरोजगारी वाढू शकते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT