मुंबई

Budget 2020: म्हणून मनसेने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार..

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुसऱ्यांदा भारताचा अर्थसंकल्प सादर केला. संसदेत आज निर्मला सीतारामन यांनी दशकातील पहिला म्हणजेच २०२० - २०२१ साठीचा अर्थसंकल्प सादर केलाय.  राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका केलीये. आज संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प 'वास्तवाचं भान हरवलेला आणि स्वप्नाच्या दुनियेत रामवणारा' अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी संबोधलं आहे.  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आजच्या अर्थसंकल्पातून ऑटोमोबाईल सेक्टर तसंच भारतातील बेरोजगारीसारखे मुद्दे योग्यप्रकारे मांडले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये. याचसोबत अर्थसंकल्पात शेती गोदामांवर लक्ष केंद्रित केलंय, मात्र याबाबत अजूनही ठोस स्पष्टता नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे हे अजूनही दिवा स्वप्न असल्याची टीका शरद पवार यांनी केलीये.   

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही. उपनगरीय रेल्वे वाहतूकीसाठी वेगळे पद निर्माण करण्याची घोषणा झाली नाही की त्यासाठीची तरतूद देखील यामध्ये नाही. मुंबईकरांची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली आहे, असं सुप्रिया सुळे म्हटलंय. 

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक बँका बुडालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. याचा फटका सामान्य जनतेला बसलाय. अशात आज निर्मला सीतारामन यांनी बँक खात्यांमधील ठेवींवरील विमा एक लाखावरून पाच लाख इतका केलाय. याचसोबत आयकराच्या नव्या प्रणालीबाबत सरकारकडून घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. त्यामुळे त्याचे मनापासून स्वागत करतो असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणालेत. याबाबत बाळा नांदगावकर यांनी स्वतः निर्मला सीतारामन यांना फेसबुकच्या माध्यमातून टॅग करत याबाबतची मागणी केली होती. ही मागणी मेनी केल्याने बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार मानलेत.      

एकंदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भाजपसोबत वाढलेली जवळीक, यामुळेच हे गौरवोद्गार आल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

MNS leader bala nandgaonkar congratulate narendra modi and center government after union budget 2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT