uddhav thackeray and raj.
uddhav thackeray and raj. 
मुंबई

मग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा - मनसे

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना, आरोग्य व्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे, त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Mns leader sandeep deshpande slam central & state govt over covid situation)

"लसीकरण जोरात करा सांगतात. पण लस उपलब्ध नाही. माणसांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तर ऑक्सिजन मिळत नाही. उपचार काय करायचे ते माहित आहे. पण रेमडेसिव्हीर मिळत नाही. व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, या सगळ्या भयावह परिस्थितीत लोकांनी जगायचं कसं?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

केंद्राकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा होत नाही, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे, यावर संदीप देशपांडे म्हणाले की, "मग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा. सामना पेपरमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकात किती लसीकरणं झालं, त्याची माहिती होती. देशात एक नंबर लसीकरण महाराष्ट्रात झालं, असं सामनामध्ये म्हटलं होतं. लसी मिळाल्या नाहीत, असं सरकारचं म्हणणं असेल, मगं एकनंबर लसीकरण महाराष्ट्रात कसं झालं?."

"आठवड्याभरापूर्वी एकादिवसात सर्वात जास्त लसीकररण महाराष्ट्रात झालं, याचा अर्थ लसींचा पुरवठा होत होता, त्या लसी कुठे गेल्या? केंद्र-राज्याच्या ब्लेम गेम मध्ये जनतेचा गेम होतोय, लोकांना खरं काही कळत नाहीय. लोकांची अवस्था काय, त्यांनी पैसे कुठून आणायचे? एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. एक फेसबुक वर बोलतात. दुसरे आकाशवाणीवरुन मन की बात सांगतात. लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही" असे संदीप देशपांडे म्हणाले.

"या लॉकडाउनचा वापर आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी करा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा. सारख लॉकडाउन लावून आर्थिक कणा मोडून घेणं, हा उपाय नाही आरोग्य व्यवस्था सुदृढ करा आणि लसीकरण हा एकमेव मार्ग आहे" असे देशपांडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT