corona van 
मुंबई

आता घरोघरी जाऊन होणार कोरोनाची चाचणी, पालिकेने लढवली 'ही' शक्कल

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र ठरलेल्या वरळी, बीडीडी चाळ, लोअर परळ आणि करी रोड परिसरात पालिकेने मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन सुरू केली आहे. या मोबाईल डिस्पेनसिंग व्हॅन च्या साहाय्याने डॉक्टर घराघरात जाऊन लोकांची तपासणी करत आहेत. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोबाईल डिस्पेनसरी व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाईल डिस्पेनसरी व्हॅनच्या माध्यमातून कोरोना प्रभावित परिसर पिंजून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांना तपासणी नंतर गोळ्या औषध देऊन त्यांचा इलाज करण्यात येत आहे. तसेच एखाद्याला कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. परीसरातील अनेक लोक या मोबाईल डिस्पेनसरीचा लाभ घेत आहेत. दाटीवाटीच्या परिसरात जाऊन तेथील कोरोना संशयितांना शोधून काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. वरळी-प्रभादेवी हा परिसर सर्वाधिक प्रभावित परिसर असल्याने येथील संसर्ग वाढीची शृंखला खंडित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

इतर परिसरातही लवकरच सेवा
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत एनएससीआय क्लब मध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. जी दक्षिण वॉर्ड मध्ये अशा प्रकारे पाच मोबाईल डिस्पेनसिंग व्हॅन सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्ण अधिक असलेल्या वरळी - प्रभादेवी परिसरात ही सेवा सुरू करण्यात आली. टप्प्याटप्प्याने इतर परिसरात देखील ही सेवा देण्यात येईल. संपूर्ण मुंबईत अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे ही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


 Mobile dispensary van to search for Corona suspects

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT