मुंबई

मुझे रूम नहीं देता क्या, रुक तुझे देखता हूँ, दुसऱ्या दिवशी तीन पोरांना पाठवून लॉजवर टाकला पेट्रोल बॉम्ब...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लॉकडाऊनमध्ये रुम दिला नाही, म्हणून हॉटेलमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकल्या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली. अटक आरोपी सराईत असून यापूर्वी त्याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोहम्मद अजीज अबु सालेम खान असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल दरोडा व हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली असून त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात अपिल केले आहे. अपिल केल्यामुळे त्याला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. याशिवाय त्याच्याविरोधात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. आरोपी गँगस्टर इजाज लकडावालाचा एकेकाळचा विश्वासू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नक्की घडलं काय ? 

दोन टाकी परिसरातील खांडीया स्ट्रीट येथे इंदौर लॉजिंग बोर्डींग आहे. 7 मे रोजी तीन व्यक्ती या हॉटेलमध्ये येऊन राहण्यासाठी रुमची मागणी करू लागले. तेव्हा हॉटेलचे मालक अब्दुल्ला करीम यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी नियमानुसार तुम्हाला रुम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी मालक अब्दुल यांच्यासोबत आरोपींनी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यांनी अब्दुलला मारहाण केली आणि तिथून पळून गेला. त्यानंतर दुस-या दिवशी तीन व्यक्ती आले आणि त्यांच्याकडील पिशवीमध्ये काही स्फोटकजन्य पदार्थ होते. त्याला माचिसने आग लावून आरोपींनी पळ काढला.

अग्नी विरोधक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली

त्या पदार्थामुळे हॉटेलच्या लाकडी दरवाज्याला आग लागली. हॉटेलचे व्यवस्थापक रजनीश मिश्रा याने त्यावेळी प्रसंगावधान राखून अग्नी विरोधक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली. त्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे कृत्य करणारे व्यक्ती एकमेकांना हाक मारत होते. त्यावरून त्यांची ओळख अजीम भाऊ, जीरा व मोईल बाटला असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीला मित्रासोबत मौजमजा करायची होती. त्यासाठी त्याला हॉटेलमधील रुम हवा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाला मोदी सरकारची मंजुरी

Latest Marathi News Live Update : ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल

पत्नीमुळे उदय सामंत आले अडचणीत? बालनाट्य स्पर्धेमध्ये राजकीय दबाव, काय आहे नवा वाद

Crime: 'तो' ॲसिड हल्ला बनावट! मुलीनेच केला होता बनाव; फोनमध्ये आढळले अश्लील फोटो, व्हिडीओ

'मन प्रसन्न तर चेहरा खुलून दिसतो'! स्मिता शेवाळेचा सकारात्मक दृष्टिकोन अन् डार्क सर्कल्सवर नैसर्गिक उपाय!

SCROLL FOR NEXT